त्या आरोपींना पाच दिवसांचा पीसीआर, संतोष सिंह रावत गोळीबार प्रकरणाचा उलगडा होणार?

हाय प्रोफाईल कनेक्शन असण्याचा पोलिसांना संशय – संतोष रावत ह्यांचा सुचक इशार

राजेंद्र झाडें, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
मो नंबर 9518368177

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुल :- काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत हयांचेवर मुल येथे 11 मे रोजी रात्रीच्या वेळी स्विफ्ट कार मधुन आलेल्या दोघांनी गोळीबार केला होता. नशीब बलवत्तर म्हणून ह्या गोळीबारात संतोष रावत ह्यांना गोळी केवळ चाटून गेली. मात्र हे आरोपी घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी ठरले होते. या घटनेनंतर चंद्रपूर जिल्हात एकच खळबळ माजली होती.

या घटनेनंतर आरोपीच्या शोध साठी पोलिसावर दबाव होता. ह्या आरोपींचा छडा लावण्यात पोलिसांनी जंग जंग पछाडले होते. सर्वपक्षीय राजकीय दबाव व नागरिकांचा रेटा ह्यामुळे अखेरीस जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्र सिंह परदेसी ह्यांनी गडचांदुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील नायक यांचेकडे तपास सोपविला. त्यांनी अत्यंत नियोजनबध्द तपास करून चंद्रपूर येथुन यादव बंधूंना अटक केली. आज चंद्रपूर न्यायालयात दोन्ही आरोपींना हजर करण्यात आले असुन न्यायालयाने दोन्ही आरोपींचा पाच दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला आहे.

अटक करण्यात आलेल्या या दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे मात्र ह्या घटनेमागे मास्टर माईंड कोण? त्यांच्याकडे पिस्तूल कशी आली? त्यांना ती कोणी पुरविली ह्यासह हत्येचा प्रयत्न करण्याचे नेमके कारण काय ह्याचा शोध घेणे गरजेचे असून समाज माध्यमांवर ह्या प्रकरणात राजकीय धागेदोरे असल्याचा दाट संशय व्यक्त केल्या जात असुन काँग्रेस पक्षाच्या एका वजनदार नेत्याकडे इशारा केल्या जात आहे.

ह्या अनुषंगाने पिडीत संतोष सिंह रावत ह्यांनी एका व्हिडिओ द्वारे दोन्ही आरोपींची तसेच आपलीही नार्को टेस्ट करण्याची मागणी केली असुन ह्या गोळीबारामागे राजकीय शक्ती असल्याचे संकेत दिले आहेत. त्याचप्रमाणे गरज भासल्यास आपण स्वतः ह्या प्रकरणातील सूत्रधाराचे नाव घोषित करू असेही सांगितले आहे हे विशेष.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

19 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

19 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

22 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

22 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

1 day ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

1 day ago