वार्धेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदावरून काँग्रेस- राष्ट्रवादीत बिनसले.

✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी मोबाईल न. 8888630841

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- वर्धा जिल्ह्यातील सातपैकी सहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सभापतीपदांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाले असले तरी वर्धा समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत ऐनवेळी बिनसले आणि फसगत झाल्याची राष्ट्रवादीची भावना झाली आहे. महाविकास आघाडीत ठरल्यानुसार सभापती पदांचे वाटप झाले. मात्र वर्धा बाजार समितीच्या सभापतीसाठी ऐनवेळी काँग्रेसने भूमिका बदलली. काँग्रेसचे आमदार रणजीत कांबळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांचे संयुक्त पॅनल निवडून आले.

या निवडणुकीत ठरल्यानुसार देशमुख गटास सभापतीपद तर कांबळे गटास उपसभापतीपद मिळणार होते. देवळी बाजार समितीत या सूत्रानुसार वाटप झाले. मात्र वर्धेत ऐनवेळी चक्रे फिरली. संचालकांचे बहुमत असणाऱ्या कांबळे गटाने सभापतीपद सोडण्यास स्पष्ट नकार दिला. वाटल्यास उपसभापतीपद देतो, असा सांगावा धाडला. मात्र फसवणूक झाल्याचे ऐन मतदानाच्या तासभरापूर्वी लक्षात आलेल्या देशमुख गटाने ही तडजोड नाकारली. देशमुख गटाचे डॉ. संदीप देशमुख यांची संधी हुकल्याने महाविकास आघाडीत अस्वस्थता पसरली. प्रचारादरम्यान आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत सभापतीपद देण्याचे मान्य करीत कांबळे गटाने संचालकांच्या अधिक जागा पदरात पाडून घेतल्या होत्या. त्यामुळे अध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळणार, हे स्पष्ट होते. पण तसे घडले नाही. कांबळेंच्या देवळी -पुलगाव मतदारसंघात जातीय ध्रुवीकरणातून मतदान होत असल्याचा इतिहास आहे. इथे कुणबी विरुद्ध तेली असे पारंपरिक राजकीय वैर आहे. कुणबी समाजाची एक गठ्ठा मते ज्येष्ठ नेत्या प्रभाताई राव यांच्या काळापासून काँग्रेसला मिळत आली आहेत. सलग निवडून येणाऱ्या प्रभा राव यांचे भाचे कांबळे हेसुद्धा याच समाजावर भिस्त ठेवून राजकारण करत असल्याचे लपून राहिलेले नाही. देवळी-पुलगावचे सभापतीपद असो किंवा पक्षीय संघटनेतील पदे असोत कांबळे कुणाला कौल देतात हे जगजाहीर आहे.

कांबळे समर्थक असलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर म्हणतात, वर्धा बाजार समितीत बहुमतातील संचालकांनी अध्यक्षपदाचा आग्रह धरल्याने नाईलाज झाला. धोका देण्याचा प्रश्नच नाही, असा दावा त्यांनी केला महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत सभापतीपद आमच्या गटाला देण्याचे निश्चित झाले होते. म्हणूनच त्यांना संचालकांची अधिक पदे दिली. हा शब्द न पाळणे म्हणजे धोका नव्हे काय, असा सवाल संदीप देशमुख यांनी केला आहे. सेलू बाजार समितीत पक्षीय विरोधक शेखर शेंडे यांना घेऊन देशमुख गट निवडणूक लढला. कांबळेंचे सहकारी असलेल्या जयस्वाल गटास सोबत न घेतल्याचा राग कांबळे गटाला होता. त्याचेच उट्टे वर्धेत काढल्याचे बोलले जाते.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

19 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

19 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

22 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

22 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

1 day ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

1 day ago