संतनगरी श्रीक्षेत्र धाबा संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थान (100 बेडचे) भक्तनिवासाकरीता वने, सांस्कृतिक व मस्त्यव्यवसाय मंत्री सूधीरभाऊ मुनगंटीवार यांनी 14 करोड रू.चे प्रस्ताव मंजूरीसाठी संबधीत विभागाकडे मंत्रालयात पाठविण्याचे आदेश.

राजेन्द्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177

चंद्रपूर:- विदर्भ आणि तेलंगणा राज्याचे आराध्य दैवत श्री संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थान धाबा ईथे दरवर्षी 6 दिवसीय जत्रा भरते. यात तेलंगणा आणि महाराष्ट्रातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात, परंतू निवासाची सोय नसल्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं.आदरणीय सूधीरभाऊ मुनगंटीवार जत्रेत आले तेव्हा त्यांना धाब्याचे विश्वस्त मंडळी भक्तनिवासाकरीता बोलले असता त्यांची अडचण लक्षात घेऊन लगेच शब्द दिले.आदरणीय सूधीरभाऊ

दिला शब्द केला पूर्णया विचारावर चालरणारे सर्वांसाठी आदर्श याचा वारंवार उलगडा होतांना दिसतो.आणि आता पून्हा एकदा आपल्याला त्याचा प्रत्यय येतांना दिसत आहे.दोन वर्षापूर्वी दिलेले शब्द आता पूर्ण होण्याचा वाटेवर आहे. सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री खाते मिळताच 8 दिवसाचा आत आदरणीय सूधीरभाऊ मुनगंटीवार यांनी गोंडपिपरी तालुक्यातील श्रीक्षेत्र धाबा साठी 14 करोड रू चे 100 बेडचे भक्तनिवासाकरीता प्रस्तावमंजूरीसाठी तयार करण्याचे आदेश दिले.

त्यावेळी तिथे श्री संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थान चे अध्यक्ष श्री. अमर बोडलावार, कोषाध्यक्ष श्री स्वप्नील अनमूलवार,गोंडपिपरीचे नगरसेवक चेतनसिंह गौर,भंगाराम तळोधीचे माजी उपसरपंच मारोती अम्मावार, तंमूस अध्यक्ष सूनिलभाऊ रामगोनवार, प पू शेषराव महाराज व्यसन मुक्त केंद्र चे अध्यक्ष गणपती चौधरी, भाजपा गोंडपिपरीचे कार्याध्यक्ष साईनाथ मास्टे आदि उपस्थित होते.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

रंगय्यापल्ली केंद्राचे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनात घवघवीत यश प्राप्त.

सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…

4 hours ago

अहेरी येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक राष्ट्रीय मानवधिकारी संघटना गठीत.

*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…

5 hours ago