✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा.न. 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असून, ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज देणार नसतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सुचना देणार आहे, अशी तंबी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना दिली आहे. शेत शिवार, शेतकऱ्यांना दिली जाणारी वीज आणि बॅंकांकडून दिले जाणाऱ्या कर्जावर बोलताना त्यांनी राज्यातील शिवसेना-भाजप सरकार शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्याच्या प्रश्नावर त्यांनी अॅग्रीकल्चर फिडरचा सोलरिझेशन करण्यात येत आहे. या उपक्रमाची सुरवात ही 2018 मध्ये झाली होती. मात्र, मध्यंतरी ही योजना फक्त कागदावर होती. आता पुन्हा नव्याने ही योजना सुरु करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी भाडेतत्वार घेण्यात येणार आहेत. एकरी 50 हजार रुपये प्रतिवर्ष असे तीस वर्षाकरिता या जमिनी घेतल्या जाणार आहेत. कृषी कर्जाकरिता सिबिलची अट लागू होत नाही. हे कर्ज शॉर्ट टर्म असते. ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नसतील त्यांच्यावर गुन्हा नोंद करा, अशा सुचना दिल्या.’
फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असल्याचे सांगितले. तसेच ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज देणार नसतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सुचना देणार असल्याचा पुनरोच्चार करत हे खपवून घेतले जाणार नसल्याचे सांगितले.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…