लुटमार करणा-या टोळीवर लोणीकंद पोलीसांकडुन मोक्का कायदया अंतर्गत कारवाई

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

लोणीकंद पोलिस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत दि. ०४/०५/२०२३ रोजी लोणीकंद – केसनंद रोडवरील भंगार दुकानदाराला धारदार शस्त्राने जखमी करून जबरदस्तीने चोरी करणान्या टोळीचा टोळी प्रमुख तानाजी अर्जुन जाधव व त्याचे इतर दोन साथीदार त्यांचे विरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.टोळी प्रमुख तानाजी अर्जुन जाधव व त्याचे इतर दोन साथीदार इसम यांनी लोणीकंद – केसनंद रोडवरील भंगार विक्रेत्याला एकटे गाठुन जबरदस्तीने पैशाची मागणी केली असता तक्रारदार यांनी त्यांना पैसे देण्यास नकार दिल्याने त्या तिघांनी संगनमत करून तक्रारदार यांना जखमी करून त्यांचे खिशातील रक्कम जबरदस्तीने चोरून नेली होती. त्यानुसार त्यांचेवर लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर गु. रजि. नं. ३५१ / २०२३ मा.दं.वि. कलम ३९४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२). ३ (४) अन्वये मान्यता मिळणेकामी सदर कायद्याचे कलम २३ (१) अ अन्वये मंजुरी प्राप्त होणेबाबत मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गजानन पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक श्री गजानन जाधव यांनी मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०४ पुणे श्री शशीकांत बोराटे यांचे मार्फतीने मा, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे श्री रंजन कुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता.

सदर प्रस्तावाची छाननी करून टोळी प्रमुख तानाजी अर्जुन जाधव, वय २२ वर्ष, रा. लाडबा वस्ती, वाबळे यांचे गाईच्या गोठया शेजारी, केसनंद ता.हवेली जि.पुणे व त्याचे इतर दोन साथीदार नामे १) रोहित राजु माने, वय २१ वर्ष, रा. गुजर वाडी, निंबाळकर वस्ती, खोपडे नगर, दत्त मंदीराचे पाठीमागे कात्रज पुणे २) ओमकार नरहरी आळंदे वय २१ वर्ष, रा. वडगाव रोड, बालाजी वस्ती केसनंद, ता हवेली, जि. पुणे यांचे विरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कलमांचा अंतर्भाव करण्याची परवानगी श्री रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर यांनी दिली असुन दाखल गुन्ह्यातील टोळी प्रमुख व त्याचे साथीदारांवर मोक्का कायद्यान्वये पुढील कारवाई होणार आहे गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे श्री किशोर जाधव हे करीत आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त सो. पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त सो. पुणे श्री संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त सो पुर्व प्रादेशिक विभाग पुणे श्री रंजन कुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त सो.. परिमंडळ ०४ पुणे श्री शशिकांत बोराटे, सहा पोलीस आयुक्त येरवडा विभाग पुणे श्री किशोर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकंद पोलीस स्टेशन श्री गजानन पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. मारुती पाटील, सहा. पोलीस निरीक्षक गजानन जाधव, पोलीस उप निरीक्षक श्रीकांत टेमगिरे, रामकृष्ण दळवी व सव्र्व्हेलन्स पथकातील पोलीस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडु यांनी केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

आता लाडका पत्रकाराचा नंबर लागेल का ! महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लक्ष देतील का ?

देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…

14 mins ago

नाशिक: पती पत्नीने गळफास लावून आत्महत्या, 10 वर्षीय चिमुकली मुलगी सुद्धा पलंगावर मृतावस्थेत.

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…

28 mins ago

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व. शरद काळे यांचा स्मृति दिन साजरा.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…

2 hours ago

कवठा येथील सरपंच प्रवीण जायदे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.

खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…

2 hours ago

सिंदी तहसील कार्यालय वर विविध मागण्यासाठी कामगार नेते डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

2 hours ago