खळबळजनक: वर्धेतील एका बँकेवर सायबर चाेरट्यांनी हल्ला करून कोट्यवधी रुपयांची केली चोरी.

✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मोबाईल. न. 8888630841

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- येथून एक खळबळजनक माहिती समोर येत आहे. येथील एका बँकेवर सायबर चाेरट्यांनी हल्ला करून कोट्यवधी रुपयांची चोरी घेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हात एकच खळबळ माजली आहे.

वर्धा येथे सायबर चाेरट्यांनी वर्धा नागरी बँकेची येस बॅंकेची युटिलीटी हॅक करुन तब्बल १ कोटी २१ लाख १६ हजार रुपयांच्या रक्कमेवर डल्ला मारला आहे. ही रक्कम विविध खात्यात परस्पर पद्धतीने वळवली गेल्याचे सांगितले जात आहे. या सायबर हल्ला प्रकरणी बॅंकेने पाेलिसांत तक्रार नाेंदवली आहे. वर्धा शहर पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत.

वर्धा नागरी सहकारी अधिकोष बॅंक ही वर्धा जिल्ह्याची एक नावाजलेली बॅंक असून अनेक नागरिकांची बॅंक खाती वर्धा नागरी बॅंकेत आहेत. मात्र, बॅंकेकडे एनएएफटी व आरटीजीएस व्यवहाराची सुविधा नसल्याने वर्धा नागरी बॅंकनेने येस बॅंकेशी संलग्नता घेतली आहे. येस बॅंकेतील खात्यातून वर्धा नागरी बॅंकेचे आरटीजीएस व एनएएफटी व्यवहार होत असतात.

२४ मे रोजी बुधवारी बॅंक बंद असताना पहाटे ६ ते सकाळी ८ या वेळेत येस बॅंकेची युटिलीटी सायबर चाेरट्यांनी हॅक करुन पैस लुटले. यामध्ये वर्धा नागरी बॅंकेच्या खात्यातून तब्बल १ कोटी २१ लाख १६ हजारांची रक्कम विविध खात्यात वळती केली. सकाळी बॅंक उघडल्यावर सर्व संगणक सुरु करुन तपासणी केली असता कर्मचाऱ्यांना ही बाब लक्षात आली. सायबर चाेरट्यांनी सकाळी ६.०७ ते ८.२६ मीनिटांपर्यंत एकूण २४ विविध खात्यात ही रक्कम वळती केल्याचे दिसले. मात्र, याच्या नोंदी कोअर बॅंकींग प्रणालीत दिसून आल्या नसल्याने येस बॅंकेची युटिलीटी हॅक करुन वर्धा नागरी बॅंकेच्या खात्यातील रक्कम सायबर चाेरट्यांनी वळती केल्याचे समजले.

या ऑनलाईन चोरी प्रकरणी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांचन अनिल केळकर यांनी याबाबतची तक्रार वर्धा शहर पोलिसात नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सायबर सेलच्या माध्यमातून केला जात आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क करा. प्रशांत जगताप संपादक 9766445348-7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

सावनेर येथे गणपती मूर्ती खरेदीवर लकी ड्रॉ चा वर्षाव.

अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- सावनेर येथील प्रसिद्ध मूर्तिकार…

7 hours ago

शेतकऱ्यांच्या मुलांची आर्थिक उन्नती हेच माझे ध्येय: ऍड. संजय धोटे राजुरा मुक्तीसंग्राम दिन प्रतिपादन.

क्रांतीची लाट उठविणाऱ्या गावात मुक्तीसंग्राम दिनाचा जल्लोष. संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…

8 hours ago

बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगलीच्या वतीने वर्षावासाच्या निमित्त धम्मदेशना कार्यक्रम संपन्न.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती…

9 hours ago

ब्रिलीअंट सीबीएसई स्कूल हिंगणघाट येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा.

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:-विद्या विकास शिक्षण संस्था हिंगणघाट…

9 hours ago

गडचिरोली: ऊसाच्या शेतात जिवंत विद्युत प्रवाह साेडलेला तारांना स्पर्श झाल्याने 17 वर्षाच्या मुलाचा मृत्यू.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिराेली:- जिल्हातील देसाईगंज तालुक्याच्या बाेळधा…

9 hours ago