पुणे शहरतील वाहतूक कोंडी कधी थांबणार..? शहरातील जनता त्रस्त, शिवसेना आक्रमक.

शैलेश ओव्हाळ, पिपंरी चिंचवड प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शहरात वाहतूक कोंडी समस्या दिवसेंनदिवस भीषण होत आहे. या वाढत्या वाहतूक कोंडीमुळे आज शहराचे पावित्र धोक्यात आले आहे. आज पुणे शहर कोंडीचे शहर म्हणून ओळखले जात आहे. या वाहतूक कोंडीमुळे शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहे. त्यामुळे पुणे शहर शिवसेना आक्रमक झाली असून दिनांक २५ मे रोजी पुणे शहर वाहतूक पोलिस उपायुक्त यांना पुणे शहरातील वाहतुक कोंडी समस्या बाबतीत निवेदन देण्यात आले आहे.

यावेळेस सुनील जाधव उपशहर प्रमुख शिवसेना, बापू खरात विभागप्रमुख वडगांवशेरी मतदारसंघ, नेहाताई शिंदे महिला अध्यक्ष व.शे.वि.म.संघ, सुहास कांबळे प्रभाग प्रमुख येरवडा, कुमार भाऊ निदांने, उध्दव गलांडे, आशिष भाऊ कांबळे, कुलदीप गागडे, सचिन चव्हाण आणि सर्व शिवसैनिक उपस्थित होते.

पुणे शहरात वाहतूक कोंडीमुळे प्रवास करण्यास बराच वेळ जातो, आर्थिक प्रगती मंदावते, रस्त्यावरील किरकोळ भांडणे वाढतात आहे, वाहन चालकांची चिडचिड वाढते, वाहनांचे इंधन मोठ्या प्रमाणावर जळते. ज्यामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण वाढते. वाहतूक कोंडीमुळे शहरात गाडीच्या इंधनाचा अनेक कोटीचा तोटा झाला. याला जबाबदार कोण?

रस्त्याचा विकास कोमात, वाहतूक कोंडीला जोमात पुणे शहराचा विकास फार झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाहन संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण रस्त्याची रुंदी वाढली नाही. पुणे शहरात अनेक आमदार, खासदार, मंत्री झाले पण पाहिजे त्या प्रमाणात रस्त्याचा विकास झाला नाही. संपूर्ण पुणे शहरात अरुंद रस्ते आहे. त्यामुळे ही वाहतून कोडीची समस्या दिवेंदिवस वाढत आहे.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेला न घाबरता आत्मविश्वासाने समोर जावे: मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- स्पर्धा परीक्षेत विदर्भातील विद्यार्थ्यांची…

21 mins ago

नागपुरात बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने युवकांना बेदम मारहाण करून रोख रुपये व सोनसाखळी लुटून फसार.

पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

1 hour ago

शंकर ढोलगे यांना शाहिद भगतसिंग राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित शहीद भगतशिंग पुरस्काराने गडचिरोली जिल्ह्याचे मान उंचावले.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809. अहेरी;-अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या गडचिरोल्ली जिल्हाध्यक्षाना…

1 hour ago

*मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी*. मोबाईल नं. 9420751809 *शहीद भगतशिंग पुरस्काराने गडचिरोली जिल्ह्याचे मान उंचावले*…

2 hours ago

70 वर्षात मूलभूत समस्या न सोडवू शकणाऱ्या नेत्यांना गाव बंदी करा संदीप कोरेत यांचे भेटी दरम्यान जनतेला आवाहन.

*पुसुकपल्ली झिंगाणुर. पूल्लीगुडम गावाला दिली भेट* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809. सिरोंचा तालुक्यातील…

2 hours ago