सावनेर येथील गोमुख कनिष्ठ महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम, 12 वी निकालात विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल.

अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी मो. नं.-9822724136

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर,28 मे:- सावनेर तालुक्यातील नांदागोमुख येथील गोमुख विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने बारावीच्या निकालात विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के तर कला शाखेचा ९२.३० टक्के निकाल देत आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखली.

गोमुख विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या विज्ञान शाखेतून वैष्णवी फकीरचंद बेलेकर ६६.५० टक्के गुण मिळवत प्रथम तर कृतिका नारायण घुगल ६३.८३ टक्के गुण मिळवत द्वितीय आली. वाणिज्य शाखेतून छकुली कृष्णाजी धोटे ७४ टक्के गुण मिळवून प्रथम तर आचल श्रीराम कैकाडे ६२ टक्के गुण मिळवून द्वितीय आली. कला शाखेतून पल्लवी अरुण भोयर ६३.५० टक्के गुण मिळवून प्रथम तर ऋषाली देवराव मिरचे ६१ टक्के गुण मिळवत द्वितीय आली. विज्ञान शाखेतून ४९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी ४९ विद्यार्थी पास झाले आहेत. वाणिज्य शाखेतून ३२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी ३२ ही विद्यार्थी पास झाले आहेत तर कला शाखेतून ७८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी ७२ विद्यार्थी पास झाले आहेत. गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे शिक्षकांनी घरी जाऊन अभिनंदन केले. तर उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. नेमराज मोवाडे, सचिव प्रा.दिनकर जिवतोडे, मुख्याध्यापक दिपक वासनिक, ओमप्रकाश मोवाडे, धनवंती मिलमिले, अनंता देरकर, तुषार धोटे, अमोल महाजन, प्रिया मोवाडे, चंदा टुले, वैशाली ताजने, संगीता सोमकुवर सह सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा. प्रशांत जगताप संपादक 9766445348-7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

सक्षम महिला नागरी बँकेचे व्यवस्थापक अनिल बुराडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश.

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट :- वर्धा जिल्ह्याचे खासदार…

2 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील वेगवेगळ्या 3 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक २१ सप्टेंबर २०२४…

2 hours ago

घरात बसून राहणाऱ्यांनी विकासावर बोलू नये:मंत्री धर्मराव बाबा आत्राम ‘त्या’ टीकेला मंत्री आत्राम यांचा चोख प्रत्युत्तर

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- अम्ब्रीशराव आत्रामांच्या ‘अहेरी विधानसभा…

2 hours ago

विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेला न घाबरता आत्मविश्वासाने समोर जावे: मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- स्पर्धा परीक्षेत विदर्भातील विद्यार्थ्यांची…

3 hours ago