कृषी विभाग व आत्मा यांच्या वतीने झरी येथे रानभाजी महोत्सव उत्साहात साजरा.

नितेश पत्रकार तालुका प्रतिनिधी 7620029220
झरी:-
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी कार्यालय झरी व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) झरी यांचे तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून रानभाजी महोत्सव प्रदर्शन व विक्री चे २२ऑगस्ट २०२२ रोजी झरी येथील पंचायत समिती सभागृहात आयोजन करण्यात आले होते. रानभाजी महोत्सव चे उद्घाटक (तहसीलदार)गिरीश जोशी, प्रमुख पाहुणे (गटविकास अधिकारी)रविकुमार सांगळे ,(आत्मा तालुका समिती अध्यक्ष)संजय दातारकर,प्रमुख मार्गदर्शक (तालुका कृषी अधिकार)अमोल आमले,यांच्या उपस्थितीत रानभाजी महोत्सव कार्यक्रमला सुरुवात झाली.

पावसाळ्यात विविध गुणधर्म असणाऱ्या अनेक वनस्पती उगवतात त्यातील अनेक वनस्पती खाण्यायोग्य असतात त्यांना आपण रानभाज्या म्हणून ओळखतो. त्यातील काही रानभाज्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त व औषधीही असतात. अशा रानभाज्यांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी तालुका कृषी विभागाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून रानभाजी महोत्सव आयोजित केला असल्याची माहिती कृषी अधिकारी अमोल आमले यांनी दिली.रानभाज्यांचे महत्त्व सर्वसामान्यापर्यंत जाण्यासाठी अशा महोत्सवांची व्याप्ती वाढविणे ही काळाची गरज आहे. रानभाजी महोत्सवामुळे रानभाज्यांना चांगले मार्केट लाभेल. त्यामुळे शेतकऱ्यांना अशा भाज्यांचे चांगले भाव मिळतील याबरोबरच जनतेला माहिती नसणाऱ्या भाज्यांचीही ओळख होईल. जून-जुलैच्या पावसाबरोबर सुरु झालेला रानभाज्यांचा हंगाम ऑक्टोबर पर्यंत चालतो. रानभाज्या निसर्गाताच उगवून येत असल्यामुळे त्या सेंद्रीय असतात त्यांची पौष्टीकताही चांगल्या दर्जाची असते. निसर्गाताच निर्माण झालेल्या या रानभाज्या जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी विभागाने रानभाज्यांच्या महोत्सवांचे सुसज्य आयोजन केले आहे. श्रावण महिन्यात निसर्गात उपलब्ध होणाऱ्या परंतु आपल्याला ओळख नसलेल्या व रोजच्या आहारात अनन्य साधारण महत्व असलेल्या रानभाज्या प्रदर्शन व विक्री मेळावा येथील पंचायत समिती सभागृहात सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेर्यंत आयोजित करण्यात आला होता.

या रानभाजी महोत्सवामध्ये प्रदर्शन व विक्री चे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवामध्ये भाज्या व रानफळे चे प्रदर्शन भरविण्यात आले होते व त्याची विक्री महोत्सवामध्ये करण्यात आली. महोत्सवामध्ये विविध रानभाजी व रानफळे चे ओळख, वैशिष्ट्ये, औषधी गुणधर्म इत्यादी सचित्र माहिती उपस्थित शेतकऱ्यांना व नागरिकांना देण्यात आली.

रानभाजी महोत्सव कार्यक्रम यशस्वितेकरिता(तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक) मनोज जाधव, (मंडळ कृषी अधिकारी) हटवार,(कृषी पर्यवेक्षक)नामदेव किनाके,सर्व कृषी सहाय्यक व कृषीमित्र यांनी परिश्रम घेतले.यावेळी कृषी सहाय्यक प्राची उईके, नम्रता कुमरे, राजू कुळमेथे, पर्यवेक्षक फुलझेले, (कृषिमित्र) निलेश भोयर, तालुक्यातील शेतकरी, सर्व कृषी विभाग कर्मचारी उपस्थित होते.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

सांगलीतील उद्योजक कुटुंबाचा बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…

16 mins ago

रंगय्यापल्ली केंद्राचे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनात घवघवीत यश प्राप्त.

सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…

5 hours ago

अहेरी येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक राष्ट्रीय मानवधिकारी संघटना गठीत.

*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…

7 hours ago