आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड यांचा व्हिडिओ माॅर्फ करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा राष्ट्रवादी काँग्रेसने दिले पोलिसांना निवेदन…

श्री नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी 8369205752

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन :- ठाणे शहरातील सिंधी बांधवांमध्ये माॅर्फ केलेला व्हिडिओ प्रसारीत करून डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात चिथावणी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. यासंदर्भात कोपरी पोलीस ठाण्यात जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या सहीचे निवेदन दिले.

दरम्यान, यावेळी प्रदेश चिटणीस नगरसेवक सुहास देसाई यांनी,” डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या भाषणाला माॅर्फ करून चिथावणी दिली जात आहे. हे असह्य आहे. म्हणून आता आम्ही न्याय मागण्यासाठी येथे आलो आहोत. असे कृत्य करणाऱ्या समाजकंटकावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली. परांजपे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहनिर्माण मंत्री मा. आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये शनिवार दिनांक 27 मे, 2023 रोजी नेताजी चौक, उल्हासनगर येथे पक्षाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ मॉर्फ करुन तो सोशल मिडीयावर पसरवून त्यांची नाहक बदनामी करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी शंकर मंदिर हॉल, कोपरी, ठाणे (पूर्व) येथे शिवसेना शिंदे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, प्रकाश कोटवानी, रोहित गायकवाड, रमाकांत पाटील, दिपक घनश्यानी, हरेश तोलानी, भाजपा युवा मोर्चाचे ओमकार चव्हाण यांनी बैठक घेतली. या बैठकीत डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचा व्हिडिओ माॅर्फ करून सिंधी समाजाला दाखवून चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. तसेच, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या घरावर हल्लाबोल मोर्चा काढण्याचा कट रचून आव्हाड यांना जीवे ठार मारण्याचे षडयंत्र रचले आहे. त्यामुळे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या भाषणाच्या मूळ व्हि़डीओमध्ये छेडछाड करुन मॉर्फ करुन तसेच सिंधी समाजाची दिशाभूल करुन त्यांची बदनामी करण्या-यांविरोधात तसेच कोपरी, ठाणे येथे बैठकीमध्ये चिथावणीखोर भाषण करणा-यांच्या विरोधात तात्काळ भादवि कलम 110, 115, 153 (अ), १५३ (ब), २९५ (अ), ५०० व १२० (ब) या कलमान्वये कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या प्रसंगी प्रदेश चिटणीस सुहास देसाई यांनी सांगितले की, कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाही. पण, सत्तेचा वापर करून डाॅ.जितेंद्र आव्हाड यांना बदनाम करण्याचा आणि त्यांच्या घरावर हल्लाबोल मोर्चा नेण्यासाठी चिथावणी दिली जात आहे. म्हणून आम्ही न्याय मागण्या साठी येथे आलो आहोत. ज्यांनी व्हिडिओ माॅर्फ केला आहे. त्यांना मी समाजकंटक असेच म्हणेन. आता पोलिसांनी सत्याची कास धरून ज्या शिंदे गटाच्या लोकांनी शंकर मंदिरात बैठक घेतली. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली.

यावेळी परिवहन सदस्य नितीन पाटील, सरचिटणीस प्रभाकर सावंत, रविंद्र पालव, लीगल सेलचे अध्यक्ष एड विनोद उतेकर, विधानसभाध्यक्ष विजय भामरे, ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे, युवकचे विधानसभाध्यक्ष संतोष मोरे, कुणाल भोईर, दिनेश मेहरोल, विद्यार्थी सेलचे अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे आदी उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या जाहिराती करीता आजच संपर्क साधावा. 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

सक्षम महिला नागरी बँकेचे व्यवस्थापक अनिल बुराडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश.

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट :- वर्धा जिल्ह्याचे खासदार…

2 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील वेगवेगळ्या 3 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक २१ सप्टेंबर २०२४…

2 hours ago

घरात बसून राहणाऱ्यांनी विकासावर बोलू नये:मंत्री धर्मराव बाबा आत्राम ‘त्या’ टीकेला मंत्री आत्राम यांचा चोख प्रत्युत्तर

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- अम्ब्रीशराव आत्रामांच्या ‘अहेरी विधानसभा…

2 hours ago

विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेला न घाबरता आत्मविश्वासाने समोर जावे: मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- स्पर्धा परीक्षेत विदर्भातील विद्यार्थ्यांची…

3 hours ago