उमेश इंगळे यांच्या मागणीला यश, अकोला सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मधील सिटि स्कॅन मशिन सुरू

अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या सर्वोउपचार रुग्णालयात वैद्यकीय सुविधा बंद आहेत परिणामी रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असुन रुग्णांची गैरसोय होत आहे. सिटी स्कॅन, एमआरआय, कॅथलॅब ,सिएसएसडी (स्टरलायजेशन),२ डी इको,टिएमटी मशिन,आदि अत्यंत महत्त्वाच्या सुविधा बंद आहेत. त्या लवकरात लवकर सुरू करा. अन्यथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य तिव्र आंदोलन छेडेल यांची नोंद घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्रवीण भोटकर यांच्या मार्गदर्शनात उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हा अधिकारी निमा अरोरा मॅडम यांना दि.२२/०५/२०२३ रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ मिनाक्षी गजभिये यांच्या सोबत चर्चा करून पाठपुरावा केला होता.

रूग्णालयात येणाऱ्या कुठल्याही रुग्णाचे हाल होऊ नयेत, किंव्हा त्यांना नाहक भुर्दंड बसू नये म्हणून उमेश सुरेशराव इंगळे यांच्या पाठपुराव्यामुळे सुपर मल्टीस्पेशालिटी मधिल सिटी स्कॅन मशिन तात्काळ सुरू करण्यात आली. उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे सिटी स्कॅन मशिन सुरू करण्यात आली असून रुग्णांला दिलासा मिळाला आहे.

हे निवेदन देतेवेळी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख समीर खान, ॲड. रोशन तायडे , सामाजिक कार्यकर्ता विशाल भोसले आदी रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती करीता आजच संपर्क साधावा. 9766445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

एकात्मिक बालविकास प्रकल्प गोंडपिपरी बीट धाबा तर्फे पोषण अभियान माह जनजागृती.

राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- 1 सप्टेंबर ते 30…

6 mins ago

पुण्यात अनैतिक संबंधातून पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने मुलींसमोरच केली पतीची निर्घृण हत्या.

वैशाली गायकवाड पुणे प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शहरातील कर्वेनगर येथून एक खळबळजनक…

13 mins ago

घरात बसून राहणाऱ्यांनी विकासावर बोलू नये:मंत्री धर्मराव बाबा आत्राम ‘त्या’ टीकेला मंत्री आत्राम यांचा चोख प्रत्युत्तर*

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी. मोबाईल नं.9421856931 एटापल्ली: अम्ब्रीशराव आत्रामांच्या ‘अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनतेला खड्ड्यात…

3 hours ago

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

22 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

23 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

1 day ago