नाशिक जिल्ह्यातील काही भागात जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के, नागरिकांत भीतीचे वातावरण.

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक :-
जिल्हात भूकंपाचे सौम्य धक्के बसले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यात कुठलीही हानी झाल्याचे दिसून आले नाही तरी नागरिकात भीतीची भावना निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

भूकंप मापक केंद्रात या भूकंपाची तीव्रतेची 2.1 आणि 2.5 रिश्टर स्केलची नोंद झाली. काल रात्री 10 वाजेच्या सुमारास दोन धक्के जाणवले. मेरी येथील केंद्रापासून 24 किलोमीटर अंतरावर भूकंपाचे केंद्र आहे. गेल्या आठ दिवसांत दुसऱ्यांदा दिंडोरी तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के लागले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने ही माहिती दिली. या घटनेत काहीही नुकसान नाही. नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

प्राप्त माहितीनुसार, रविवारला रात्रीच्या सुमारास दिंडोरी शहरात भूकंपाचे दोन धक्के जाणवले. 10 वाजून 6 मिनिटांनी पहिला, तर 10 वाजून 15 मिनिटांनी दुसरा धक्का जाणवला. नागरिक झोपण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात हा धक्का बसल्यानं नागरिक घराबाहेर पडले. जमिनीला हादरे बसल्याचं स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले. यापूर्वी आलेल्या धक्क्यात जांबुटके गावात मोठे हादरे बसले होते. नाशिक जिल्ह्यात चार दिवसांपूर्वी दिंडोरी तालुक्यातील काही गावांना भूकंपाचे धक्के बसले. हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं होतं. याच परिसरात रविवारी पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवलेत. पेठ, सुरगाणा आदी भागात जुलै महिन्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर दिंडोरीतही भूकंपाचे धक्के जाणवले.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

सांगलीतील उद्योजक कुटुंबाचा बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…

4 mins ago

रंगय्यापल्ली केंद्राचे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनात घवघवीत यश प्राप्त.

सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…

5 hours ago

अहेरी येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक राष्ट्रीय मानवधिकारी संघटना गठीत.

*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…

6 hours ago