पुण्यात अवैध रित्या पिस्तूल विक्री, पिस्तूल काडतूस सह सिंहगड पोलिसांनी एकाला ठोकल्या बेड्या…..

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- दि.3:- पुणे शहरात गुन्हेगारी मोठया प्रमाणात वाढत आहे. त्यात अवैधरित्या शस्त्र पण वापरण्यात येत आहे. अशीच एक कारवाई करत देशी बनावटीचे पिस्तूल विकण्यासाठी आलेल्या एकाला पोलिसांनी सिंहगड रस्ता परिसरात ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले आहे. वैभव विजय वाल्हेकर वय 29 वर्ष, रा. कामथडी, भोर असे अटक केलेल्याचे नाव आहे.

नऱ्हे भागात एक जण पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यातील गस्त घालणारे पोलिस कर्मचारी अमोल तांबे आणि माने यांना मिळाली होती. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून वाल्हेकरला पकडले. त्याच्याकडे असलेल्या पिशवीची तपासणी केली असता त्यात देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस सापडले. वाल्हेकर पिस्तुलाची विक्री कोणाला करणार होता, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा, सहायक आयुक्त राजेंद्र पलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन, गुन्हे शाखेचे निरीक्षक जयंत राजूरकर, सहायक निरीक्षक राहुल यादव, उपनिरीक्षक गणेश मोकाशी, शंकर कुंभार आणि रवींद्र अहिरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

सक्षम महिला नागरी बँकेचे व्यवस्थापक अनिल बुराडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश.

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट :- वर्धा जिल्ह्याचे खासदार…

2 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील वेगवेगळ्या 3 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक २१ सप्टेंबर २०२४…

2 hours ago

घरात बसून राहणाऱ्यांनी विकासावर बोलू नये:मंत्री धर्मराव बाबा आत्राम ‘त्या’ टीकेला मंत्री आत्राम यांचा चोख प्रत्युत्तर

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- अम्ब्रीशराव आत्रामांच्या ‘अहेरी विधानसभा…

2 hours ago

विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेला न घाबरता आत्मविश्वासाने समोर जावे: मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- स्पर्धा परीक्षेत विदर्भातील विद्यार्थ्यांची…

3 hours ago