बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या ग्रामीण भागातील विकास कामांसाठी 55 कोटी 50 लक्ष मंजूर वन व सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याचे फलित

सौ. हनिशा दुधे बल्लारपूर तालुका प्रतिनिधि
चंद्रपूर दि. 23 ऑगस्ट
:- राज्‍याचे वन व सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रात रस्ते व पुलांच्या बांधकामासाठी 55 कोटी 50 लक्ष रुपयांच्या विकास कामांना मंजूरी मिळाली आहे.

ग्रामीण भागातील जनतेची, रस्‍ते व पुलासंदर्भातील मागणी लक्षात घेता श्री. मुनगंटीवार यांनी केलेल्या पाठपुराव्‍याला यश प्राप्‍त झाले आहे. जुलै 2022 च्‍या पुरवणी अर्थसंकल्‍पात मंजूर विकासकामांमध्‍ये प्रामुख्‍याने बल्‍लारपूर तालुक्‍यातील मानोरा-कवडजई-कोठारी रस्‍त्‍याची सुधारणा 6 कोटी रुपये, माना-नांदगांव-विसापूर रस्‍त्‍याची सुधारणा 3 कोटी 50 लक्ष, चंद्रपूर तालुक्‍यातील मरारसावरी-नागाळा रस्‍त्‍यावर अंधारी नदीवरील मोठया पुलाच्‍या पोचमार्गाकरीता भुसंपादन करणे 50 लक्ष, चंद्रपूर तालुक्‍यातील तालुका सीमा ते मुल तालुक्‍यातील टेकाडी- चिमढा- आकापूर-दत्‍तमंदीर- ताडाळा- हळदी- दहेगांव- मानकापूर- नलेश्‍वर- खालवसपेठ- चिरोली- टोलेवाही- नागाळा रस्‍त्‍याची सुधारणा 4 कोटी 50लक्ष, दुर्गापूर- सिनाळा- वरवट- चोरगांव-मामला-बोर्डा-वलन या रस्‍त्‍याची सुधारणा 4 कोटी रुपये.

मुल तालुक्‍यातील उमरी तुकूम- आंबेधानोरा- डोंगरहळदी -सुशी- नलेश्‍वर- मानकापूर- हळदी- चिचाळा- फिस्‍कुटी -चांदापूर रस्‍त्‍याची सुधारणा 1 कोटी 80 लक्ष, पेटगांव- भादुर्णी- मारोडा-मुल -चिचाळा- भेजगांव रस्‍त्‍याची सुधारणा 19 कोटी, पेटगांव- राजोली- पाथरी रस्‍त्‍याची सुधारणा करणे 3 कोटी 90 लक्ष, पोंभुर्णा तालुक्यातील वडकुली -चेक बल्‍लारपूर- चिंतलधाबा- केमारा- भटारी ते नवीन राष्‍ट्रीय महामार्गाची सुधारणा 3 कोटी, टेकाडी-चिमढा-आकापूर-दत्‍तमंदीर-ताडाळा-हळदी-दहेगांव-मानकापूर-नलेश्‍वर-खालवसपेठ-चिरोली-टोलेवाही-नागाळा या रस्‍त्‍यावर लहान पुलाचे बांधकाम करणे 2 कोटी, मुल तालुक्‍यातील नवेगांव-गांगलवाडी-भादुर्णी-पडझरी-सोमनाथ-मारोडा या रस्‍त्‍यावर लहान पुलाचे बांधकाम करणे 1 कोटी 80 लक्ष, एमआयडीसी-दाताळा चंद्रपूर रस्‍त्‍यावरील कॅबल स्टँड उंच पुलाच्‍या पोचमार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण, चौपदरीकरण व विद्युत वाहिनींचे स्‍थलांतरण करणे 5 कोटी 50 लक्ष रुपये अशी 55 कोटी 50 लक्ष रू. किंमतीची विकासकामे मंजूर करण्‍यात आली आहे.

ग्रामीण भागातील रस्‍ते व पुलाच्‍या बांधकामाची कामे मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने मार्गी लागल्‍यामुळे नागरिकांमध्‍ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

महाराष्ट्रातील महायुती सरकारची कोंडी, सरकारने आचार संहितेच्या उल्लंघन केल्या बाबत चौकशी सुरू.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…

10 hours ago

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

12 hours ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

1 day ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

2 days ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago