पुणे: एअर होस्टेज बनण्याचे स्वप्न राहल अधुर, 19 वर्षीय तरुणीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू.

जोसेफ नडेसन पुणे शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे:- येथून एक अपघाताची दुर्दैवी घटना समोर आली आहे येथील वाघोली येथे बोअरवेल खोदण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रकखाली आल्याने एका दुचाकी स्वार तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना वाघोली येथील केसनंद रस्त्यावरील नायरा पेट्रोल पंपासमोर घडली या अपघातात एक दुचाकीवरील तरुण जखमी झाला आहे. गौरवी रवींद्र जाधव वय 19 वर्ष सध्या रा. गुलमोहर सोसायटी, वाघोली, मूळगाव – कोल्हापूर असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष कुमार व गौरवी जाधव हे दोघे दुचाकीवरून जात असताना ट्रकचा दुचाकीला धक्का लागल्याने ते दोघे खाली पडले. त्यामुळे गौरवी ही ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रकचालक लक्ष्मण चिन्नास्वामी वय 39 वर्ष, रा. कोलवडी याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महादेव लिंगे करीत आहेत.

19 वर्षीय गौरवी हीचे एअर होस्टेज बनण्याचे स्वप्न होते. त्यामुळे ती कोल्हापूर येथून पुणे येथे आली होती. पण तीच अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ती राहत असलेल्या परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

नागपुरात बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने युवकांना बेदम मारहाण करून रोख रुपये व सोनसाखळी लुटून फसार.

पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

33 mins ago

शंकर ढोलगे यांना शाहिद भगतसिंग राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित शहीद भगतशिंग पुरस्काराने गडचिरोली जिल्ह्याचे मान उंचावले.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809. अहेरी;-अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या गडचिरोल्ली जिल्हाध्यक्षाना…

48 mins ago

*मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी*. मोबाईल नं. 9420751809 *शहीद भगतशिंग पुरस्काराने गडचिरोली जिल्ह्याचे मान उंचावले*…

1 hour ago

70 वर्षात मूलभूत समस्या न सोडवू शकणाऱ्या नेत्यांना गाव बंदी करा संदीप कोरेत यांचे भेटी दरम्यान जनतेला आवाहन.

*पुसुकपल्ली झिंगाणुर. पूल्लीगुडम गावाला दिली भेट* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809. सिरोंचा तालुक्यातील…

1 hour ago

हिंगणघाट येथे तुळसकर फार्मसी महाविद्यालयाला मंजुरी प्रदान, आमदार समीर कुणावार यांचे पाठपुराव्याला यश.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात विविध व्यवसायिक…

2 hours ago