नागपूर: महिला वकील झाली मनपाची तोयत्यी अधिकारी बिल्डरला मागली खंडणी, पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- येथून एक खळबळ जनक घटना समोर आली आहे. येथे एक महिला वकिलाला बिल्डर करून खंडणी मागीतली म्हणून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. महिला वकिलाला चक्क खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली म्हणून एकच खळबळ माजली आहे.

नागपुर महानगर पालिकेच्या नगररचना विभागात कार्यरत असल्याचे सांगून एका महिला वकिलाने आपल्या एका सहकाऱ्याच्या मदतीने बिल्डर कडून 5 लाखांची खंडणी मागितली. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने एक लाख रुपये घेत असताना महिला वकिलाला अटक केली. नसरिन हैदरी रा. कामठी आणि संजय शर्मा अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

नागपुर येथील बिल्डर रमेश आसूदानी वय 69 वर्ष राह. जरिपटका यांची टीव्ही टॉवरजवळ पशुवैद्यकिय महाविद्यालयाच्या मागे निर्माण ग्रेस नावाने कंस्ट्रक्शन साईट सुरू आहे. गेल्या आठवड्यात हैदरी व शर्मा यांनी आसूदानी यांच्या निर्माणधीन बांधकाम साईडवर जाऊन छायाचित्र काढले. त्यानंतर या दोघांनी मिळून बिल्डर असलेल्या आसूदानी यांच्या मुलाला फोन करून तुम्ही करत असलेले निर्माणधीन बांधकाम हे अवैध असल्याच्या तक्रारी असल्याचे सांगितले. तुम्ही बांधकाम करत असलेल्या कामाची परवानगी व्यवस्थित घेतल्या नाहीत तसेच महानगर पालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकारी नसरीन हैदरी यांना दोन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जर तक्रार दाबायची असेल तर माझा माणूस संजय शर्मा तुमच्याशी बोलेल, असे हैदरीने आसूदानी यांना सांगितले. त्यानंतर ती आणि संजय शर्मा दोघेही जरीपटका परिसरात असलेले आसूदानी यांच्या कार्यालयात गेले. त्यांनी बांधकामाची परवानगी देण्याच्या नावावर आणि तक्रारींची फाईल बंद करण्यासाठी 5 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास बांधकाम बंद पाडण्याची धमकी दिली. पण आसूदानी यांना या दोघावर संशय आला आणि त्यांनी नागपुर येथील गुन्हे शाखेचे उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांच्याकडे तक्रार केली.

यावेळी सुदर्शन तक्रारीची शहानिशा करून सापळा कारवाई करण्याचे आदेश दिले.असे फसले खंडणी बहाद्दूर:महिला वकील नसरीन हैदर आणि संजय शर्मा यांचे पितळ उघडं पाडण्यासाठी आसूदानी यांनी नसरीन हैदर आणि संजय शर्मा यांना खंडणी देण्याची तयारी दर्शविली. जैस्वाल हॉटेलजवळ खंडणी विरोधी पथकातर्फे सापळा रचण्यात आला. आसूदानी यांच्याकडून एक लाख रुपये स्वीकारताच दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींविरोधात यशोधरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख शारीन दुर्गे, ईश्वर जगदाळे, चेतन जाधव, सुधीर सौंदरकर, नितीन वासने, अनिल बोटरे आणि पूनम शेंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

19 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

20 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

22 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

22 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

1 day ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

1 day ago