मातंग समाजाच्या वृध्द शेतकऱ्याच्या हत्याकांडाने महाराष्ट्र हादळला. सर्विकडे संतापाची लाट.

सहा जणांनी मिळून डोक्यात पाठीमागून कुऱ्हाडीचे वार करत केली हत्या.

प्रशांत जगताप, महाराष्ट्र संदेश न्युज
औरंगाबाद:-
येथून संपूर्ण महाराष्ट्राला हादवणारी घटना समोर येत आहे. आज देशात मोठ्या प्रमाणात जातीवाद वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे अनेक दलीत परिवारावर अन्याय अत्याचार वाढले आहे. अशीच एक घटना समोर आली आहे.

गायरान पडीत जमिनीच्या वादातून दाखल झालेला ॲट्रॉसिटीचा गुन्हा मागे घे म्हणत वृद्ध मातंग समाजाच्या शेतकऱ्याच्या डोक्यात पाठीमागून कुऱ्हाडीचे वार करू दि.18 ऑगस्ट ला निर्घृण हत्या करण्यात आली होती. जनार्दन कोंडिबा कसारे वय 56 वर्ष, रा. साईनगर, पिसादेवी असे हत्या करण्यात आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणातील सहापैकी चार आरोपींना ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस उपाधीक्षक जयदत्त भवर यांच्या पथकासह चिकलठाणा पोलिसांचे पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. शिवाजी महादू औताडे, गिरिजा बाळू औताडे, महादू गंगाराम औताडे आणि भरत महादू औताडे रा. सर्व हर्सूल अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. बाळू महादू औताडे आणि बबन निवृत्ती रोडे हे दोघे आरोपी सध्या फरार आहेत. त्यांचा पोलिस शोध घेत आहे.

प्राप्त माहितीनुसार, पिसादेवी परिसरात नऊ एकर गायरान जमीन आहे. मागील 35 वर्षांपासून नऊ एकरांपैकी आठ एकर जमीन जनार्दन कसारे हे मातंग समाजातील शेतकरी शेती करत होते. तसेच एक एकर जमीन ही महादू गंगाराम औताडे याच्या ताब्यात आहे. या जमिनीवरूनच 2008 मध्ये आणि त्यानंतर कसारे आणि औताडे कुटुंबामध्ये वाद झाला होता. त्यात मातंग समाजाच्या शेतकऱ्याला जातीत शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली होती तेव्हा या प्रकरणात औताडे विरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जनार्दन कसारे यांच्यावर 18 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली.

मातंग समाजाच्या शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने वार केल्यानंतर त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्त बाहेर येत होते त्यांना तातडीने रिक्षाने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री नऊ वाजेदरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जनार्दन यांना मृत घोषित केले.

हत्याकांड घडवून आणणारे सहाही आरोपींना जो पर्यंत अटक करण्यात येत नाही, तोपर्यंत जनार्दन कसारे या वृद्ध शेतकऱ्याचा यांचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा कसारे कुटुंबीयांसह नातेवाईक, विविध संघटनांनी घेतला होता. अखेर काही मागण्या मान्य केल्याने कसारे यांचा मृतदेह दुपारी सव्वातीन वाजेदरम्यान स्वीकारला. मृतदेहावर साडेचार वाजेदरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत जनार्दन यांना दोन मुले आणि एक विवाहित मुलगी आहे.

पोलिसांनी 4 आरोपीला ठोकल्या बेळ्या..
संपूर्ण महाराष्ट्राला हादवणाऱ्या मातंग समाजाच्या शेतकऱ्याच्या हत्याकांडातील चार आरोपींना अटक करून चिकलठाणा पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने चारही आरोपींना पोलिस कोठडी देण्यात आली आहे. काय म्हणाले पोलिस, प्रशासकीय अधिकारी. उपजिल्हाधिकारी रोडगे यांनी मृताच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदतीसाठी प्रस्ताव पाठवू, गायरान जमिनीसंदर्भात तहसीलदार, तलाठी यांना पाहणीच्या सूचना देऊ असे सांगितले. तर मृताच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण देऊन पोलिस दलाकडून समाजकल्याण विभागाकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे भवर यांनी बोलताना सांगितले.

संताप, राग अन आक्रोश…

शुक्रवारी घाटी रुग्णालयात शवविच्छेदन विभागासमोर कसारे यांच्या कुटुंबीयासह नातेवाईक, विविध सामाजिक संघटनांची गर्दी झाली होती. आरोपींना अटक आणि गायरान जमिनी संदर्भातील ठोस निर्णय झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेत घाटीत राग, संताप व्यक्त करत कुटुंबीयांचा आक्रोश होता. घाटी रुग्णालयात पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा लावण्यात आला होता.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

महाराष्ट्रातील महायुती सरकारची कोंडी, सरकारने आचार संहितेच्या उल्लंघन केल्या बाबत चौकशी सुरू.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…

5 hours ago

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

8 hours ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

1 day ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

1 day ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago