चंद्रपूर जिल्हाधिका-यांनी घेतला आयुष्यमान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा आढावा.

सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधि
चंद्रपूर दि.23 ऑगस्ट :-
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजनेबाबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जनआरोग्य योजनेचे विभागीय व्यवस्थापक डॉ. सुमित भगत व विविध रुग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिका-यांनी सदर योजनेंतर्गत अंगिकृत शासकीय व खाजगी रुग्णालयांमार्फत करण्यात आलेल्या कामांची माहिती, रुग्णालयांच्या तक्रारीचा आढावा, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना कार्ड वितरणाबाबत आढावा घेतला.

जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण 12 रुग्णालये वरील दोन्ही योजनेकरीता अंगिकृत असून यापैकी पाच शासकीय रुग्णालये आहे. रुग्णालयांच्या तक्रारीबाबत प्रकरणे प्रलंबित न ठेवता त्वरीत निकाली काढाव्यात. तसेच आयुष्यमान भारत कार्डचे वितरण रुग्णालय स्तरावर विशेष शिबिर लावून करावे, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

चंद्रपूर जिल्ह्यात आयुष्यमान भारत कार्ड वाटपाचे उद्दिष्ट 8 लक्ष 30 हजार 893 असून यापैकी 1 लक्ष 97 हजार 987 कार्ड वाटप झाले आहे. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेकरीता अंत्योदय, अन्नपूर्ण, पिवळे व केशरी शिधापत्रिकाधारक तसेच कोणतेही शासकीय ओळखपत्र असणे आवश्यक आहे. तसेच महात्मा फुले योजनेंतर्गत दीड लक्ष रुपयांपर्यंत तर आयुष्यमान भारत योजनेंतर्गत पुढील 3.50 लक्ष रुपयांपर्यंत असे एकूण पाच लक्ष रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा आहे.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत एकूण 996 प्रकारचे उपचार तर प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेंतर्गत एकूण 1209 प्रकारचे उपचारांचा समावेश करण्यात आल्याचे डॉ. भगत यांनी सांगितले.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

सांगलीतील उद्योजक कुटुंबाचा बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…

24 mins ago

रंगय्यापल्ली केंद्राचे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनात घवघवीत यश प्राप्त.

सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…

5 hours ago

अहेरी येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक राष्ट्रीय मानवधिकारी संघटना गठीत.

*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…

7 hours ago