माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मोर्चा.

ईसा तडवी, जळगाव उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन जळगाव:- ग्रामीण मतदार संघातील तसेच सर्व भागातील शेतकरी आज पेरणी तोंडावर येऊन देखील अनेक समस्यांनी त्रस्त झाला आहे शेतकऱ्यांच्या घरात अजूनही 80 टक्के कापूस पडलेला असून व्यापारी देखील फिरकत नाही त्यामुळे पेरणीसाठी पैसा कुठून उभा करावा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडलेला आहे. या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना मागण्यांचे निवेदन देऊन प्रश्न शासन दरबारी मांडून त्वरित सोडवाव्यात अशी मागणी केली.

यावेळी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात कापूस लागवडीसाठी बियाण्यांची कृत्रिम टंचाई दाखवून शेतकऱ्यांना अधिक दराने बियाणे विक्री केले जात आहे, कापसाला १२ हजार रुपये भाव देऊन शेतकऱ्यांच्या घरात असलेला कापूस त्वरित विक्री व्हावा, महात्मा फुले कर्जमाफी योजने अंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान त्वरित जमा करावे, वादळ व गारपीटग्रस्तांना त्वरित मदत मिळावी, शेतीसाठी असलेला वीज पुरवठा त्वरित व सुरळीत द्यावा या समस्यांचे निवेदन जळगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून देण्यात आले.

शेतकऱ्याचा प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी देण्यात आलेल्या निवेदनावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख पंकज महाजन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक योगराज सपकाळे, दिलीप कोळी, डॉ.अरुण पाटील, तालुका अध्यक्ष बापू परदेशी,युवक तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण, विद्यार्थी तालुका अध्यक्ष गोलू पवार, किसान सभा तालुका अध्यक्ष ईश्वर पाटील, दिलीप चव्हाण, हेमंत पाटील, विजय नारखेडे, धवल पाटील, संतोष नेटके, नवल पाटील, विनोद कोळी,उमेश पाटील, भूषण पाटील, ईश्वर पाटील, भिका चव्हाण, उत्तम महाजन, सुधाकर सपकाळे, बरकत अली, कैलास पाटील, चंदू पाटील, चेतन कोळी, प्रविण पाटील, जयराम सोनवणे, विक्रम पाटील यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या आणि प्रतिनिधी बनण्याकरीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

घरात बसून राहणाऱ्यांनी विकासावर बोलू नये:मंत्री धर्मराव बाबा आत्राम ‘त्या’ टीकेला मंत्री आत्राम यांचा चोख प्रत्युत्तर*

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी. मोबाईल नं.9421856931 एटापल्ली: अम्ब्रीशराव आत्रामांच्या ‘अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनतेला खड्ड्यात…

1 hour ago

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

20 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

21 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

23 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

24 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

1 day ago