अग्निशमन दलाचे अधिकारी त्वरित निलंबित करा, शेतकरी संघटनेची मागणी मुख्याधिकारी व तहीलदार कळमेश्वर यांना निवेदन.

युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कळमेश्वर:- येथील अग्निशमन दलाचा हलगर्जी कारभारामुळे तालुक्यातील अनेक नागरिक त्रस्त आहे. अग्निशमन दल हे अतिदक्षता विभागात येत असलेल्या त्यांना अपडेट राहणं जरूरी असते. कळमेश्वर येथील अग्निशमन दलाचा कारभार भगवान भरोसे सुरू असून नागरिकांना आर्थिक आणि मृत्यूच्या खाईत लोटत आहे.

कळमेश्वर शहरासह तालुक्यात एक महिन्यात चार वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या घटना विघुत शॉर्ट सर्किट मुळे घडल्या आगीमध्ये घर हॉटेल्स जिनिंग जळून यामधील स्टेशनरी कापूस फर्निचर झेरॉक्स मशीन व इतर वस्तू जळून करोडो रुपयांचे नुकसान झाले या आकस्मिक घटनेबाबत संबंधित अग्निशमन दलाचे अधिकारी यांना प्रत्यक्षदर्शी व घर दुकान मालकांनी दूरध्वनीद्वारे कळविले असता अग्निशमन दलाचे अधिकारी लांडगे यांनी वाहन चालक नाही तर कधी गाडीत पाणी नसल्याचे उडवडीचे उत्तर दिले आणि अग्निशमन दल वाहन प्रत्येक घटनेमध्ये अर्धा ते एक तास उशिरा घटनास्थळी पोहोचल्याने घर जिनिंग व्यापारी दुकान हॉटेल यांची राख रांगोळी झाली वाहन जर वेळेत पोचले असते तर प्रचंड नुकसान झाले नसते.

वरोडा येथील कापूस जिनिंग चे मालक अन्सारी वाढवणा बुजुर्ग येथील घरमालक गोपाल ढोले कळमेश्वर येथील बिकानेर हॉटेल मालक हमीर सिंह पुरोहित ब्राह्मणी फाटा येथील हॉटेल व जनरल स्टोअर्स मालक रमेश मांगे यांचा आगीत खास झालेल्या दुकानाचा समावेश असून सर्व घटनेत अग्निशमन दलाच्या हलगर्जीपणा व निष्क्रियतेमुळे प्रचंड आर्थिक नुकसान झालेले आहे अग्निशमन दल वाहन हे वेळेत पोहोचले असते तर नुकसान ठरले असते याला सर्वस्वी अग्निशमन दलाचे अधिकारी लांडगे सह कर्मचारी जबाबदार आहेत कळमेश्वर नगर परिषद येथील अग्निशमन दलाच्या विभागात कुठल्याही प्रशिक्षित कर्मचारी नाहीत. सदर घटनेत सर्वस्वी अग्निशमन दलाचे अधिकारी लोखंडेसह कर्मचारी जबाबदार आहेत यांना त्वरित निलंबित करण्यात यावे अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन शेतकरी संघटनेच्या वतीने नुकतेच नगरपरिषद मुख्याधिकारी पांडागळे तसेच तहसीलदार रोशन मकवाने यांना शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले.

यावेळी शिष्टमंडळात शेतकरी संघटनेचे नागपूर जिल्हाध्यक्ष संजय चौधरी, तालुका अध्यक्ष महेंद्र सातपुते, उपाध्यक्ष मनीष शेंडे, विदर्भ चीफ ब्युरो पत्रकार युवराज मेश्राम, संघटनेचे संघटक पंकज गायकवाड,दीपक निंबाळकर, प्रमोद बागडे ल, ज्ञानेश्वर कडू मंगेश गमे, राजेश श्रीखंडे, जीवन बागडे, मंगेश मांगे, श्रीराम भिवगडे, आकाश नागपुरे, हेमंत गोंगे, निखिल गावंडे इत्यादींची उपस्थिती होती

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

19 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

19 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

22 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

22 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

1 day ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

1 day ago