गडचिरोली: पोलिसांची फसवणूक चक्क बदलीसाठी पाठवला गृहसचिवांच्या नावे बनावट आदेश; एकाला ठोकल्या बेड्या.

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हात पोलीस विभागाची फसवणूक झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे गृहविभागाच्या सहसचिवांच्या नावे पोलीस अधीक्षकांना ई- मेलद्वारे दोन अंमलदारांच्या बदल्यांचे बनावट आदेश दिल्याचे खळबळजनक प्रकरण काही दिवसापूर्वी समोर आले होते. याचा प्रकरणाच्या स्पर्दाफास करण्यात पोलिसांना यश आले असून हा बदली आदेश एका महिला अंमलदाराच्या पतीनेच पाठविल्याचे निष्पन्न झाले असून आरोपी संदीप मड्डेलवार याला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहे.

गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना 9 मे 2023 रोजी गृह विभागाच्या कार्यालयाचा पत्ता असलेला ई- मेल प्राप्त झाला होता. यात पोलीस मदत केंद्र धोडराज येथील हवालदार जमीलखान पठाण यांची पोलीस अधीक्षक कार्यालय, नक्षल सेल व पोलीस मदत केंद्र गट्टाजाभिया येथील अंमलदार मीनाक्षी पोरेड्डीवार यांची पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे तात्पुरती बदली केल्याचा उल्लेख होता. त्याखाली सहसचिव म्हणून व्यंकटेश भट यांचे नाव व स्वाक्षरी होती. गृहविभागाच्या नियमित ई- मेलवरून हा मेल आला नव्हता. शिवाय अंमलदारांच्या बदल्यांचे आदेश गृहविभागातून निघत नाहीत. त्यामुळे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना शंका आली. त्यांनी सायबर विभागाकडे चौकशी सोपवली. उपनिरीक्षक सागर आव्हाड यांनी गृहविभागात जाऊन चौकशी केली असता हा मेल त्यांनी पाठविलाच नसल्याचे स्पष्ट झाले. उपनिरीक्षक नीलेश वाघ यांच्या फिर्यादीवरून गडचिरोली ठाण्यात फसवणूक व माहिती – तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदविला, त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांनी तपासचक्रे गतिमान केली.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

16 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

17 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

19 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

20 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

23 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

24 hours ago