युवा शेतकरी पती आणि पत्नीने एकाच साडीने गळफास घेऊन आत्महत्या, सर्विकडे हळहळ.

प्रवीण जगताप, प्रतिनिधी

उस्मानाबाद:- येथून एक खळबळजनक घटना समोर येत आहे, एका पती आणि पत्नीने एकाच साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सर्विकडे एकच धक्का बसला असून संपूर्ण जिल्हा हादळला आहे. सततच्या भांडणाला कंटाळून त्याचबरोबर खासगी कर्ज डोक्यावर असल्याने सदर पती आणि पत्नीने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. सदर घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील नायगाव या गावात घडली आहे. प्रकाश वसंत दीक्षित वय 30 वर्ष असे पतीचे नाव आहे. तर अश्विनी प्रकाश दीक्षित वय 27 वर्ष अशी आत्महत्या केलेल्या पती आणि पत्नीची नावे आहे.

प्राप्त माहितीनुसार, मयत प्रकाश दीक्षित हे मागील काही वर्षा पासून शेती करत होते. सततच्या नापिकीमुळे त्यांच्या डोक्यावर कर्जाचे ओझे झाले होते. त्यात यावर्षी मुसळधार पाऊसामुळे शेतीत पीक नाही त्यातच त्यांनी काही खासगी सावकारांकडून देखील कर्ज घेतले होते. शेतात काही पिकत नसल्याने कर्ज फिटत नव्हते. त्यामुळे त्यांनी आपली जमीन खासगी कर्ज फेडण्यासाठी विकली होती. त्यावरून दोघा पती आणि पत्नीमध्ये सतत वाद व्हायचा. याच उद्रेकातून दोघांनी टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

दीक्षित कुटुंबातील पती-पत्नीने रविवारी म्हणजेच 21 ऑगस्ट रोजी रात्री राहत्या घरातील पत्र्याखालील लोखंडी आडूला एकाच साडीने गळफास घेऊन
आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. दरम्यान पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनास पाठवले असून, पती आणि पत्नीने केलेल्या आत्महेत्येमुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे.

मृतक प्रकाश यांच्या आईंनी सांगितले की, प्रकाश सतत निराश असायचा. कारण, खासगी कर्ज फेडण्यासाठी त्याने चार एकरपैकी दीड एकर जमीन विकली म्हणून प्रकाश आणि अश्विनी यांच्यामध्ये रोजच भांडण व्हायचे, या वादातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी.’ प्रकाश व अश्विनी यांच्या मागे आई, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

3 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

3 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

3 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

3 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

3 hours ago

अभिनव विचार मंच तर्फे सोपानदादा कनेरकर यांचा कौटुंबिक प्रबोधन जागर जाणिवांचा कार्यक्रमाचे 25 डिसेंबर रोजी आयोजन.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…

4 hours ago