राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक यांची वडनेर गावाला भेट, जाणून घेतल्या गावातील समस्या.

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी मोबा नंबर :- 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील वडनेर हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवर असलेले असून तालुक्यातील मोठे गाव आहे वडनेर सह 40 ते 45 गावातील लोकांचा जनसंपर्क असून दररोज अवागमन होत असते येथे राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण काम झालेले आहे परंतु गावात येणाऱ्या जाणाऱ्या रस्ता कंत्राटदाराने केलेला नाही त्यामुळे नागरिकांना मागील अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात त्रास भोगाव लागत आहे. पावसाळ्यातील पावसाचे पाणी निघण्यासाठी नालिचे बांधकाम न केल्यामुळे लोकांच्या घरांमध्ये पाणी साचत असते त्यामुळे लोकांना त्रास होत आहे. वडनेर येथे परिसरातील अनेक गावातील विद्यार्थी शिक्षणा करिता येत असते त्यांना सुद्धा त्रास होत असते.

गावात येणाऱ्या जाण्याचा रस्ता नसल्यामुळे वडनेर सह सर्वांना त्रास भोगावा लागत असल्या मुळे वडनेर येथील सरपंच सौ. कविताताई विनोदराव वानखेडे यांनी अनेकदा गटविकास अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून वडनेर येथील रस्त्याबाबत लेखी निवेदन सुद्धा दिलेले आहे प्रशासनातील अधिकारी कोर्टाचे कारण सांगून रस्ता तयार करण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे सरपंच उपसरपंच व वडनेर येथील नागरिकांनी मागील एक वर्षा अगोदर आमदार समीर भाऊ कुणावर यांच्याकडे रस्ता तयार करण्यासाठी मागणी केली होती त्यावेळेस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी एक महिन्यात रस्ता करून देतो असे सांगितले परंतु अद्यापही न झाल्याने विनोद वानखेडे हिंगणघाट तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सह कविता वानखेडे सरपंच ग्रामपंचायत वडनेर सुभाष शिंदे उपसरपंच ग्रामपंचायत वडनेर राजेंद्रजी दादाजी भुरे उपाध्यक्ष खरिद्री विक्री संघ हिंगणघाट त्यांचे वतीने तहसीलदार हिंगणघाट यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन मुंबई यांना एक महिना अगोदर निवेदन सादर करण्यात आलेले होते त्यांनी शासनाकडे दखल घेऊन दिनांक सात सहा 2023 ला मान्य प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग यवतमाळ अभियंता व कॉन्ट्रॅक्टदार वडनेर येथे येऊन प्रत्यक्ष विनोद वानखेडे यांच्यासह संपूर्ण रस्त्याची पाहणी करून रस्ता पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रकल्प संचालक व विनोद वानखेडे व नागरिकांशी चर्चा करून तात्काळ रस्ता बांधकाम करण्याच्या सूचना कॉन्ट्रॅक्टदार यांना दिलेल्या आहे. विशेष समीर भाऊ कुणावर आमदार हे सुद्धा वडनेर गावातील अपूर्ण रस्ता पूर्ण व्हावा याकरिता आग्रही आहे असे श्री मानकर प्रकल्प संचालक यांनी वडनेर भेटीदरम्यान सांगितले.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

सक्षम महिला नागरी बँकेचे व्यवस्थापक अनिल बुराडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश.

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट :- वर्धा जिल्ह्याचे खासदार…

2 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील वेगवेगळ्या 3 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक २१ सप्टेंबर २०२४…

2 hours ago

घरात बसून राहणाऱ्यांनी विकासावर बोलू नये:मंत्री धर्मराव बाबा आत्राम ‘त्या’ टीकेला मंत्री आत्राम यांचा चोख प्रत्युत्तर

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- अम्ब्रीशराव आत्रामांच्या ‘अहेरी विधानसभा…

2 hours ago

विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेला न घाबरता आत्मविश्वासाने समोर जावे: मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- स्पर्धा परीक्षेत विदर्भातील विद्यार्थ्यांची…

3 hours ago