वाहन चोरी व मोबाईल चोरी करणारा गुन्हेगार येरवडा तपास पथकाकडुन जेरबंद

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- येरवडा परिसरात वडगाव शेरी येथे मोटार सायकल चोरी करणारे दोन इसम थांबलेले आहेत अशी बातमी तपास पथकाचे अंमलदार, अश्विन देठे व प्रशांत कांबळे यांना मिळाल्याने सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन यांना कळविल्याने त्यांनी मिळालेली माहितीवरुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे व अंमलदार यांनी तेथे जावून संशयीत इरामारा पळून जात असताना अतिशय शिताफीने पकडले. त्यास त्यांचे नाव पत्ता विचारता मकसुद एनुल्ला खान, वय २९, रा. मुंढवा, पुणे ( अटक) व एक विधीसंघर्षित बालक ( ताब्यात) असे असल्याचे सांगितले. सदर इसमाचे ताब्यात एक होंडा अॅक्टीव्हा मोटार सायकल मिळुन आल्याने, त्याबाबत अधिक चौकशी करता सदर गाडी त्यांनी वडगा-शेरी येथून चोरी केल्याचे कबूल केले आहे.. येरवडा पोलीस स्टेशनला सदरबाबत पडताळणी केली असता येरवडा पो स्टे गुरनं.३८८/२०२३. भादवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल असल्याने सदर गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने मकसुद खान यास दि.०९/०६/ २०२३ रोजी अटक केली आहे. सदर आरोपीकडे अधिक तपास करता त्यांनी चंदननगर भागात एक मोटारसायकल व एक मोबाईल चोरी केल्याचे कबूल करुन सदरचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरबाबत चंदननगर पो. स्टे. येथे पडताळणी केली असता ०२ गुन्हे

दाखल असल्याने आरोपीचा सहभाग निष्पन्न झाल्याने सदरचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

१.येरवडा पो.स्टे. गु.र.नं. ३८८ / २०२३ भादवि ३७९
२.चंदननगर पो.स्टे. गु.र.नं. १८३/२०२३ भादवि ३७९ २
३.चंदननगर पो.स्टे. गु.र.नं. २२७/ २०२३ भादवि ३७९
४. असे एकूण ०३ गुन्हयातील मिळून तीन मोटार सायकल व १ मोबाईल असा एकूण १ लाख ५ हजार रुपये किया मुद्देमाल जप्त करुन एकूण ३ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

सदरची कामगिरी पोलीस उपआयुक्त, परिमंडळ- ४, श्री. शशिकांत बोराटे, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, श्री किशोर जाधव वपोनि येरवडा, श्री बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक, गुन्हे, येरवडा, पुणे, श्री. जयदिप गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे, श्रेणी पोउपनि प्रदिप सुर्वे, पोलीस अंमलदार, गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, अमजद शेख, सागर जगदाळे, कैलास डुकरे, प्रविण खाटमोडे, पोअ अनिल शिंदे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, अश्विन देठे, सुशांत भोसले, गणेश खरात व सुजित सातपुते यांनी केलेली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेला न घाबरता आत्मविश्वासाने समोर जावे: मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचे करिअर मार्गदर्शन सेमिनारचे प्रतिपादन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- स्पर्धा परीक्षेत विदर्भातील विद्यार्थ्यांची…

1 min ago

नागपुरात बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने युवकांना बेदम मारहाण करून रोख रुपये व सोनसाखळी लुटून फसार.

पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

53 mins ago

शंकर ढोलगे यांना शाहिद भगतसिंग राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित शहीद भगतशिंग पुरस्काराने गडचिरोली जिल्ह्याचे मान उंचावले.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809. अहेरी;-अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या गडचिरोल्ली जिल्हाध्यक्षाना…

1 hour ago

*मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी*. मोबाईल नं. 9420751809 *शहीद भगतशिंग पुरस्काराने गडचिरोली जिल्ह्याचे मान उंचावले*…

1 hour ago

70 वर्षात मूलभूत समस्या न सोडवू शकणाऱ्या नेत्यांना गाव बंदी करा संदीप कोरेत यांचे भेटी दरम्यान जनतेला आवाहन.

*पुसुकपल्ली झिंगाणुर. पूल्लीगुडम गावाला दिली भेट* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809. सिरोंचा तालुक्यातील…

2 hours ago