सोन्या काळभोर टोळीतील सराईत गुन्हेगाराकडुन ०१ पिस्टल व ०१ जिवंत काडतुस दरोडा विरोधी पथकाकडुन जप्त 

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

दरोडा विरोधी पथक पिंपरी चिंचवड शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे सो यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध्द शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची बातमी प्राप्त करून त्यांचेविरुद्ध कडक कार्यवाही करणेबाबत आदेश दिलेले होते. सदर आदेशाप्रमाणे जितेंद्र कदम, पोलीस निरीक्षक, दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिं. चिं. यांनी त्यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार मा. यांना त्याबाबत सुचना दिलेल्या होत्या. आकुर्डी व निगडी भागातील कुख्यात गुन्हेगार सोन्या काळभोर याचे टोळीतील सराईत गुन्हेगार बाळासाहेब सातपुते हा सध्या आकुर्डी व निगडी भागामध्ये सदर टोळीच्या वर्चस्व वाढविण्याचे काम करीत होता. स्थानिक नागरीकांना दमदाटी करण्याचे काम तो सध्या करीत होता त्याचे दहशितीमुळे स्थानिक नागरीक हे पोलीसांत तक्रार देण्यास देखील पुढे येत नव्हते. सध्या तो स्वतःजवळ पिस्टल बाळगुन स्थानिक व्यापाऱ्यांना दमदाटीचे करण्याचे व सोन्या काळभोर या टोळीचे वर्चस्व वाढविण्याचे काम करीत असताना दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिं चि कडील अधिकारी व अमलदार हे त्याचे मागावर होते. त्यादरम्यान पोलीस शिपाई २६४३ गणेश सांवत पोलीस शिपाई २६७३ सुमित देवकर व पोलीस शिपाई २९४७ विनोद वीर यांना नमुद सराईत गुन्हेगार बाळासाहेब सातपुते हा कमरेस पिस्टल लावुन भक्ती शक्ती चौकाकडुन क्रिष्णा वेज हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्याने जात आहे. अशी बातमी प्राप्त होताच त्यांनी सदरची बातमी ही पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांना सांगितली असता त्यांनी त्यांचे अधिपत्याखालील पो. हवा / ७०२ उमेश पुलगम, पो.ना / १०६२ गणेश हिंगे, पो.ना. / १२३४ प्रविण कांबळे पो.ना. / १४५८ आशिष बनकर, पो.शि. / २६४३ गणेश सावत व पो.शि./२९४७ विनोद वीर व पो. शि. २६७३ सुमित देवकर यांना बातमीची खातरजमा करून कारवाई करणेबाबत सुचना दिल्या. नमुद पथकाने डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड कडुन ट्रान्सपोर्ट नगरकडे जाणान्या वळणास, निगडी प्राधिकरण, पुणे येथे लावला, नमुद इसम हा सदर परिसरात आल्यावर त्यास पोलीस त्याचे मागावर असल्याची चाहुल लागताच त्याने तेथून पळुन जाण्याचा प्रयत्न केला. दरोडा विरोधी पथकाकडील वरील स्टाफने त्याचा पाठलाग करून त्यास शिताफिने ताब्यात घेतले. नमुद सराईत गुन्हेगार नामे बाळासाहेब अंगदराव सातपुते, वय २६ वर्षे रा अनुबाई काळभोर चाळ, आकुर्डी पुणे याचेकडुन १ ३५,००० रुपये किं सिल्वर रंगाची लोखडी गावठी पिस्टल २. १,००० रुपये किं चे एक जिवंत पितळी काडतुस हे जप्त करण्यात आलेले आहे. नमुद इसमाविरुध्द निगडी पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

आरोपी बाळासाहेब अंगदराव सातपुते याचे वरील पुर्वीचे दाखल गुन्हे.
१. निगडी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड गुन्हा रजि.नं. १३४ / २०२१ भा.द.वि. कलम ३०७ व इतर प्रमाणे
२. निगडी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड शस्त्र अधिनियम क ४ (२५) प्रमाणे
३. निगडी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड हे अ क १८४ १८५.१३० प्रमाणे

सदर कामगिरी मा. श्री. विनयकुमार चौबे साो. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. संजय शिंदे सो सह पोलीस आयुक्त, पिपरी चिंचवड, मा. स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा मा श्री कोपनर सो. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, १ श्री. जितेंद्र कदम, पोलीस निरीक्षक, दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखा, पी हवा उमेश पुलगम पो ना आशिष बनकर, पी ना प्रविण कांबळे, पो ना गणेश हिंगे, पो. शि. विनोद वीर पो शि. गणेश सावंत पो. शि. सुमित देवकर सर्व नेमणुक दरोडा विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

घरात बसून राहणाऱ्यांनी विकासावर बोलू नये:मंत्री धर्मराव बाबा आत्राम ‘त्या’ टीकेला मंत्री आत्राम यांचा चोख प्रत्युत्तर*

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी. मोबाईल नं.9421856931 एटापल्ली: अम्ब्रीशराव आत्रामांच्या ‘अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनतेला खड्ड्यात…

3 hours ago

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

22 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

22 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

1 day ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

1 day ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

1 day ago