रोडने पायी जाणा-या इसमांचे मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेणारे युनिट ०१ कडुन जेरबंद, १४ मोबाईल व वाहन जप्त

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

गुन्हे शाखा युनिट १ पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- शहरामध्ये येणा-या पालखी आगमनाचे अनुषंगाने व युनिट १ कार्यक्षेत्रात होणा-या मोबाईल जबरी पोरीच्या अनुषंगाने युनिट १ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार गुन्हे प्रतिबंध पेट्रोलिंग करून रेकॉर्डवरील गुन्हेगारा बद्दल माहिती घेत असताना पोलीस अंमलदार अनिकेत बाबर यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, हत्ती गणपती मंदिराचे समोरील बोळामध्ये सदाशिव पेठ येथे तीन इसम हे काळे रंगाचे मोटार सायकलवरुन मोबाईल विक्रीसाठी येणार असुन सदरचे मोबाईल चोरीचे आहेत. वगैरे मजकुराची माहिती मिळाले नंतर सदरची माहिती आम्ही स्वतः मा. वरिष्ठांना कळविली असता वरिष्ठांनी योग्य से मार्गदर्शन करून कारवाई करणे कामी तोंडी आदेशित केले होते.

अशी बातमी प्राप्त झाल्याने लागलीच युनिट १ चे प्रभारी अधिकारी मा. पोनि श्री शब्बीर सय्यद युनिट १ गुन्हे शाखा पुणे यांनी टिम तयार करुन ती गणपती मंदिराचे समोरील बोळामध्ये सदाशिव पेठ पुणे येथे मिळालेल्या बातमी प्रमाणे तीन इसम आल्यानंतर खात्री झाल्यानंतर त्यांना सदर ठिकाणी सापळा लावुन सायं १७.०० छापा टाकून सदर इसमास आहे त्यास्थितीत ताब्यात घेवून पंचासमक्ष त्यांना त्याचे नावे पत्ते विचारता त्यांनी आपले नावे पत्ते १) धनराज शिवाजी काळुंके वय २१ वर्षे रा. वाडेश्वर नगर, बॉलिवुड थिएटर जवळ वडगांव शेरी पुणे २) विरेंद्रकुमार जगदीश प्रसाद प्रजापती, वय २५ वर्षे रा. १३ ताडीवाला रोड, मेरु हॉटेल जवळ पुणे ३) किशोर सुरेश कोल्हे वय ३० वर्षे रा. गवळी गल्ली, सारथी शाळेशेजारी, साईनाथ नगर, वडगांव शेरी पुणे असे त्यांचे किं १,२१,०००/- चे १४ मोबाईल व ७०,०००/- रु किंची दुचाकी मोटर सायकल असे एकुण १,९१,०००/- किंचा माल पंचासमक्ष ताब्यात घेवुन जप्त करुन पंचनामा केला आहे. त्यांचेकडुन मोबाईल जबरी चोरीचे विश्रामबाग पो स्टे कडील २ गुन्हे समर्थ पो स्टे कडील ३ गुन्हे, फरासखाना पो स्टे, दत्तवाडी, बंडगार्डन कडील १ असे एकुण ८ गुन्हे उघडकीस आले आहे. सदर इसमांना पुढील कारवाई कामी विश्रामबाग स्टेशन पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.यातील आरोपी नामे धनराज शिवाजी काळुंके वय २१ वर्षे रा. वाडेश्वर नगर, बॉलिवुड थिएटर जवळ वडगांव शेरी पुणे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यांच्यावर वाहनचोरीचे एकुण ०६ गुन्हे दाखल आहे.

सदरची कामगिरी मा. श्री रितेश कुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री संदिप कर्णिक सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, मा. श्री अमोल झेंडे पोलीस उप- गुन्हे, पुणे शहर, मा. श्री सुनिल पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद युनिट ०१, सहा पोलीस निरीक्षक अशिष कवठेकर, पोलीस उप निरीक्षक सुनिल कुलकर्णी, रमेश तापकिर, अजय जाधव, पोलीस अंमलदार अनिकेत बाबर, राहुल मखरे, शशिकांत दरेकर, दत्ता सोनावणे, आय्याज दडीकर, अभिनव लडकत, इमरान शेख, निलेश साबळे, शुभम देसाई, आण्णा माने, तुषार माळवदकर व महेश बामगुडे यांनी केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

19 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

20 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

22 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

22 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

1 day ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

1 day ago