वर्धा जिल्ह्यात अट्टल गुन्हेगार ताब्यात; चार गुन्हे उघड, घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार प्रवीण आक्केवार याला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या.

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी मोबा नंबर :- 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार प्रवीण आक्केवार याला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेत वर्धा जिल्ह्यातील घरफोडीचे 02 गुन्हे व बाहेर जिल्हयातील 02 गुन्हे उघड केले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. 08 जून रोजी पोलीस स्टेशन रामनगर येथे अप क्रं 514/23 कलम 454, 457, 380 भा द वि चा फिर्यादी सुनील धोबे रा वृंदावन नगर वर्धा यांचे तक्रारी वरून दाखल आहे. सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांच्याकडून करीत असतांना स्थानिक गुन्हा शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना यातील आरोपी अट्टल घरफोडीचे गुन्हे करणारा प्रवीण विनायक अक्केवार वय 55 वर्ष, रा. ऐकुरी वार्ड, राजकला टॉकीज जवळ, चंद्रपूर तहसील जिल्हा चंद्रपूर हा वर्धा परीसरात संशयास्पद रित्या फिरत असताना मिळून आला होता. त्यास ताब्यात घेऊन पंचासमक्ष त्याचे ताब्यातील बॅगची व अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यातून 1) गुन्हा करण्याकरिता वापरलेल्या एक लोखंडी टॉमी किंमत 1,00 रूपये 2) पिवळ्या धातूंचे दागिने व पांढरा धातुचे शिक्के, 3) घरांचे दारे व अलमारी उघडण्याकरिता वापरात येणाऱ्या चाब्या 23 नग 4) एक अँड्रॉइड मोबाइल किंमत 20,000 रूपये 5) एक साधा मोबाईल की 1, 000रूपये 6) नगदी 1,328 रूपये असा एकूण 22,428 रूपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने तो मोका जप्ती पंचनामाप्रमाणे जप्त करून आरोपीस त्याचे ताब्यातील चोरीच्या मालाबाबत त्यास ताब्यात घेतले.

त्यानंतर आरोपीची सखोल विचारपूस केली असता आरोपीने सदरचा गुन्हा केल्याची माहिती दिली. त्यास विश्वासात घेऊन अधिक विचारपुस केली असता त्याने 01 महिन्यापूर्वी वर्धा येथे येऊन पो.स्टे. सावंगी मेघे अप. क्रमांक – 266/23 कलम 454,457, 380 भा.द.वि गुन्हा केल्याची माहिती दिल्याने आरोपीकडून एकूण 02 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून आरोपीस मुद्देमालासह पुढील कारवाई करिता पोलिस स्टेशन रामनगर येथे दि. 10 जून रोजी 01.26 वा. सा. क्र. 04/23 अन्वये अटक करून ताब्यात दिले.

सदर आरोपी हा अट्टल घरफोडी करणारा गुन्हेगार आहे. त्यांचेकडून पो स्टे अभिलेखवरील आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आरोपीवर चोरी व घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहे. तसेच आरोपी याने पो स्टे वणी जिल्हा यवतमाळ येथील 02 गुन्हे केल्याची माहिती दिली आहे. सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक नूरूल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांचे निर्देशाप्रमाणे पोउपनी अमोल लगड, पो.हवा. गजानन लामसे, यशवंत गोल्हर, राजेन्द्र जयसिंगपुरे, रितेश शर्मा, गोपाल बावनकर यांनी केली आहे.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

19 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

19 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

22 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

22 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

1 day ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

1 day ago