देवेंद्र सिरसाट, हिंगणा (नागपुर) तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- जिल्हातील हिंगणा येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या वैशाली नगर परिसरात एका नराधम व्यक्तीने चार वर्षीय मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली. त्यानंतर रविवारी सकाळी एमआयडीसी पोलिसांनी नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. अभिजित शेषराव मानेकर वय 25 वर्ष रा. एकात्मता नगर, हिंगणा रोड नागपूर असे आरोपीचे नाव आहे.
पीडित बालिका ही एकात्मता नगराला लागून असलेल्या दुसऱ्या नगरात आईसोबत राहते. तिला वडील नाही. नराधम आरोपी हा दूरचा मामा लागतो. त्यामुळे तो पीडितेच्या घरी त्याचे जाणे-येणे होते. 10 जून रोजी पीडितेची आई मजुरीचा गेली होती. दुपारी चार वाजता आरोपी बालिकेला घेऊन घराशेजारी असलेल्या नाल्याजवळ घेऊन गेला. तिथे पीडितेसोबत अश्लील चाळे करत असताना काही तरुणांना दिसला. ते मुलीच्या मदतीला येताना पाहून आरोपी पळून गेला. त्यानंतर लोकांना वाटले की, हा पुन्हा मुलीच्या घराकडे येणार नाही. पण रविवारी दिनांक 11 जून ला पुन्हा सकाळी नराधम आरोपी मुलीच्या घराकडे येताना दिसला. परिसरातील तरुणांनी त्याला पकडले. त्यानंतर सर्व हकीकत त्यांनी पिढीत मुलीच्या आईला सांगितले. त्यानंतर पोलिसात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
पीडितेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भीमा नरके यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शारदा भोपाळे या करीत आहेत.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…