बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बुलढाणा:- बुलढाणा जिल्हा संग्रामपूर तालुक्यातील वकाणा ग्रामपंचायत मध्ये खुप मोठ्या प्रमाणावर भष्ट्राचार सुरू असुन सर्व कारभार ग्रामपंचायतचा शिपाई पाहतो. वकाणा ग्रामपंचायत मधला शिपाई हा ग्रामसेवक सोबतच संग्रामपुरला असतो. आणि आठवड्यात दोन दिवस तो ग्रामपंचायत कार्यालय उघडतो. ते पन तीन तास बाकी दिवस ग्रामपंचायत कार्यालय बंदच असते. सदर शिपाई यांची पत्नी आशा सेविका आहे. आणी ती महिला जळगांवला राहते. सर्व काम वकाणा ग्रामपंचायत शिपाई पाहतो. त्याच्या मर्जीतील लोकांना ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ देतो. या वकाणा ग्रामपंचायत मध्ये खरोखरच ज्यांना घरकुलाची गरज आहे, अश्या लोकांना डावलुन ज्यांना गरज नाही, ग्रामपंचायत सरपंच, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य हेच लोक स्वतःच्या नावावर घरकुल मंजूर करून बांधुन घेत आहेत. या वकाणा ग्रामपंचायत मध्ये खुप मोठा घरकुल घोटाळा झाला असून जिल्हा परिषद, पंचायत समिती,व वकाणा ग्रामपंचायत मधिल वरिष्ठ अधिकारी पण या घोटाळ्यात सामिल आहेत.
वकाणा ग्रामपंचायत मध्ये खुप मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार सुरू असुन लवकरात लवकर कारवाई करावी व लाचलुचपत प्रतिबंधक विभागा मार्फत सदर ग्रामपंचायत भष्ट्राचार करणाऱ्या लोकांनची चौकशी करावी.व त्या शिपाईला कायमचे पदमुक्त करण्यात यावे. सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी दि.०३/०५/२०२३ रोजी माहिती अर्ज दाखल करून वकाणा ग्रामपंचायत मधिल घरकुल संबंधित माहिती मागितली होती. सदर माहिती त्यांना मिळाली पंरतु त्या माहीती मध्ये ज्या लोकांन जवळ स्वतःची जागा नाही अश्या लोकांना पण घरकुल मंजूर केले ते कोणत्या आधारावर व कोणत्या नियमानुसार मंजुर केले, Reg.no.MH132632223 हे वकाणा ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच यांचे पती आहेत. त्यांना पण घरकुल मंजूर करण्यात आले. यांना कोणत्या नियमानुसार घरकुल मंजूर केले, 2007 पासुन तर 2012 पर्यंत एक महिला सरपंच होत्या यांचे पती यांना पण घरकुल मंजूर केले या व्यक्तिने नालीवर अतिक्रमण करुन शौचालय चे बांधकाम केले तरी त्यांना पण घरकुल मंजूर करून पुर्ण रक्कम सुपुर्द करण्यात आली ते कोणत्या नियमानुसार तसेच वकाणा ग्रामपंचायत अंतर्गत मंजूर घरकुलापैकी बहुतांश घरकुल अतिक्रमण केलेल्या जागेवर जागेवर बांधण्यात आले, तरीही त्यांना पुर्ण रक्कम सुपुर्द करण्यात आली ते कोणत्या नियमानुसार.
तसेच एक महिला २०१२ ते २०१७ पर्यंत वकाणा ग्रामपंचायतचे सरपंच होते. त्यांना आशा हे पद कसे व कोणत्या वर्षी देण्यात आले. याची माहिती का दडऊन ठेवली सर्व मुद्याची चौकशी करून कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व याला जबाबदार जिल्हा प्रशासन असेल याची नोंद घ्यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी जिल्हाधिकारी, बुलढाणा यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या आणि प्रतिनीधी बनाण्याकरिता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…