इंद्रकुमार मेघवाल प्रकरणी नागपूर बसपाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

युवराज मेश्राम नागपूर जिल्हा प्रतिनिधी


नागपूर:- राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील सुराणा गावच्या सरस्वती विद्या मंदिरात तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या इंद्रकुमार मेघवाल या नव वर्षीय दलित बालकाला त्या शाळेचे मुख्याध्यापक व संचालक छेलसिंग भोमिया राजपूत याने दलित असूनही माझ्या पाण्याच्या मटक्याला हात का लावला? या कारणा वरून बेदम मारहाण केल्याने 15 आगस्ट रोजी त्या बालकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी कार्यवाही साठी बसपाने नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांना आज निवेदन दिले.

बसपा ने दिलेल्या निवेदनात
1) इंद्रकुमार मेघवाल प्रकरणाची सीबीआय चौकशी करणे,
2) मेघवाल परिवाराला एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देणे,
3) मृतक इंद्रकुमार देवाराम ह्यांच्या परिवारांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करणे,
4) प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून एक वर्षाच्या आत मध्ये त्याचा निकाल लावणे,
5) जातीयवादी छेलसिंग याला अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतीबांधक कायद्या अंतर्गत फाशीची शिक्षा देणे, तो
6) मुख्याध्यापक व संचालक असलेल्या त्याच्या सरस्वती विद्यालयाची मान्यता रद्द करणे, आदी मागण्या याप्रसंगी निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

यावेळी निवेदन देताना बसपाचे प्रदेश कोषाध्यक्ष महेंद्र रामटेके, महासचिव नागोराव जयकर, प्रदेश सचिव पृथ्वीराज शेंडे, विजयकुमार डहाट, उत्तम शेवडे, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, महिला नेत्या प्रीती बोदेले यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले. निवेदन राष्ट्रपती व प्रधानमंत्री भारत सरकार यांच्या नावाने पाठविण्यात आले निवेदनापूर्वी बसपा नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पुष्पगुच्च देऊन त्यांचे नागपूर आगमनासाठी स्वागत केले.

याप्रसंगी चंद्रशेखर कांबळे, तपेश पाटील, बुद्धम राऊत, नालंदा पझारे, सुरेखा डोंगरे, वैशाली गणवीर, सुनंदा नितनवरे, नगरसेवक इब्राहिम टेलर, महेश वासनिक, प्रेमलाल कुवर, सावलदास गजभिये, अनिल मेश्राम, अविनाश नारनवरे, अभिलेश वाहने, राजकुमार बोरकर, चंद्रसेन पाटील, गोपाल मेश्राम, प्रवीण पाटील, यादव भगत, मॅक्स बोधी, नारायने आदी प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

महाराष्ट्रातील महायुती सरकारची कोंडी, सरकारने आचार संहितेच्या उल्लंघन केल्या बाबत चौकशी सुरू.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…

16 hours ago

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

18 hours ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

2 days ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

2 days ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

3 days ago