✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी मोबा नंबर :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील उपजिल्हा रुग्णालयात गाजावाजा करून करण्यात आलेल्या व त्यांनतर कुलूपबंद असलेले आयसीयू साठी आवश्यक तो कर्मचारी वर्ग भरण्यासाठी सद्बुद्धी द्यावी व प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट सुरू करावे ह्या मागणी साठी आज सकाळी 11 वाजता कारंजा चौक येथे सुरू केलेले सद्बुद्धी आंदोलन दुपारी 3 वाजता या चौकातील श्री हनुमानजी यांना प्रतिकात्मक निवेदन देऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली.
रुग्णमित्र गजू कुबडे हे आपल्या अनोख्या आंदोलन शैलीसाठी परिचित आहेत. आज त्यांनी या मतदारसंघाला भेडसावत असलेल्या समस्यां बाबत कारंजा चौकात एक दिवसाचे अनोखे सद्बुद्धी आंदोलन केले व आंदोलनाची सांगता चौकातील श्री पवनसुत हनुमानजी यांच्या मूर्तीला निवेदन देऊन केली.
या निवेदनातून पवनसुत हनुमानजी यांना साकडे घालतांना म्हटले आहे की, येथील उपजिल्हा रुग्णालयात मोठा गाजावाजा करून खासदार तडस, आमदार कुणावार यांनी आयसीयू चे उदघाटन केले. आता रुग्णाना बाहेरगावी पाठविण्यात येणार नाही याबाबत सर्वसामान्य जनतेला विश्वास होता. परंतु सकाळी उदघाटन झालेले आयसीयू संध्याकाळी कुलूपबंद झाले. या आयसीयू साठी 41कर्मचाऱ्यांचा स्टाफ पाहिजे परंतु त्याची व्यवस्था न करता हे उदघाटन करण्यात आले. त्यामुळे हनुमंतरायाने ह्या प्रशासनाला उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक तो स्टाफ भरण्यासाठी सद्बुद्धी द्यावी तसेच 24 एप्रिलला प्रायश्चित्त आंदोलनाचे यश म्हणून गर्भवती महिलांना सोनोग्राफी उपजिल्हा रुग्णालयात सुरू झाली परंतु यासाठी तज्ञा डॉक्टर म्हणून डॉ. रेवतकर यांची नियुक्ती करण्यात आली परंतु दीड महिना होऊनही अद्यापही उपजिल्हा रुग्णालयात डॉ. रेवतकर रुजू झाले नसल्याने त्यांना सक्तीचे आदेश द्यावे .
वर्धा जिल्ह्यातील प्रस्तावित मेडिकल कॉलेज हिंगणघाट येथे मंजूर करावे कारण येथील भौगोलिक व अन्य स्थिती पाहता हे कॉलेज हिंगणघाट येथेच व्हावे व त्यासाठी हनुमंताने शासनाला सद्बुद्धी प्रदान करावी द्यावी या मागणीसाठी कारंजा चौक येथील हनुमानजी यांना निवेदन देऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली.
आज सकाळी 11 वाजता गजू कुबडे यांनी छत्रपती शिवराय, महात्मा गांधी यांना वंदन करून आपल्या आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी अजय लढी, गोपाळ मांडवकर, राजेश बोभाटे, सूरज कुबडे, सतीश गलांडे, सुधीर मोरेवार, मोहन पेरकुंडे, अखिल धाबर्डे, राजेश लखाणी, रितेश गुडधे, विद्या गिरी, छाया येरेकर, राम पोले, सागर आत्राम, प्रकाश मने, रोशन बरबटकर, समीर मानकर, तबरेज खान पठाण, विजय पडोळे, रजत डंभारे, देवा धोटे, प्रवीण बोरूटकर, संदीप जुमडे, भीमसेन गोटे,राहुल चौधरी, मंगेश पाटील, प्रशांत धोबे, प्रशांत आवारी, भूषण जिकार, करणं विटाळे, अविनाश नवरखेले, श्याम ईडपवार,दीपक पावडे, चेतन किलनाके, बालू बुचके, अमोल धारणे, रामराव खानझोडे, रोशन वरघणे, रोशन खोडे, राकेश झाडे, दीपक जोशी, गजानन देवढे, मारोती महाकाळकर, राजेश पंपानवार, बंडू लाखे, रुपेश लाजूरकर, मोहन तुमडाम, अनिल भोंगाडे, राकेश क्षीरसागर सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आंदोलनस्थळी शहरातील शेकडो नागरिकांनी भेट देऊन आंदोलनाला समर्थन दिले.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…