मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक :- सध्या वातावरणातील बदल मुळे मोठ्या प्रमाणात संसर्गजन्य रोगाचे रुग्ण वाढत आहे त्यात आता नाशिक शहरात स्वाइन फ्लूबरोबरच डेंग्यूने डोके वर काढल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. ऑगस्ट महिन्यात डेंग्यूच्या संशयितांचा आकडा 245 पर्यंत पोहोचला असून, आतापर्यंत 70 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे. जुलैमध्ये शहरात डेंग्यूचे अवघे 23 रुग्ण आढळून आले होते. मात्र, ऑगस्टमधील ही संख्या तीनपट झाल्याने चिंता वाढली आहे.
शहरात डेंग्यू, चिकुनगुनियासह साथीच्या आजारांचा उद्रेक होऊ नये म्हणून शहरात ठेकेदारामार्फत औषधे व जंतुनाशकांची फवारणी केली जाते. परंतु हा ठेकाच गेल्या सव्वादोन वर्षांपासून वादात सापडल्याने, शहरात धूर फवारणीचे काम सक्षमतेने होत नसल्याची विदारक स्थिती सध्या बघावयास मिळत आहे. परिणामी शहरात स्वाइन फ्लू, डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मे महिन्यात शहरात डेंग्यूचे अवघे पाच रुग्ण होते. त्यानंतर जूनमध्ये हा आकडा 11 पर्यंत पोहोचला होता. जुलैत डेंग्यूबाधितांची संख्या 23 पर्यंत मर्यादित होती. परंतु, ऑगस्ट महिन्यात तीन आठवड्यांत त्यात तीनपट वाढ झाली आहे.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…