तेंदूपत्‍ता रॉयल्‍टीच्‍या स्‍वरूपात मिळणारी रक्‍कम यापुढे पूर्णपणे मजूरांना बोनसच्‍या स्‍वरूपात देणार. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विधान परिषदेत घोषणा.

राजेन्द्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177

चंद्रपुर :- तेंदूपत्‍त्‍यापासून वनविभागाला रॉयल्‍टीच्‍या स्‍वरूपात मिळणा-या राशीमधून प्रशासकीय खर्च वजा करता उर्वरित रक्‍कम प्रोत्‍साहनार्थ मजूरी अर्थात बोनस म्‍हणून तेंदूपत्‍ता मजूरांना दिली जाते. मात्र २०२२ पासून रॉयल्‍टीच्‍या स्‍वरूपात मिळणारी रक्‍कम ही पूर्णपणे बोनसच्‍या स्‍वरूपात मजूरांना देण्‍याचा निर्णय वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत जाहीर केला.

दिनांक २४ ऑगस्‍ट २०२२ रोजी विधान परिषदेत वि.प.स. डॉ. परिणय फुके यांनी उपस्थित केलेल्‍या लक्षवेधी सुचनेला उत्‍तर देताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली. २०२० मध्‍ये रॉयल्‍टीच्‍या स्‍वरूपात मिळालेली रक्‍कम ही प्रशासकीय खर्चापेक्षा कमी असल्‍यामुळे बोनस दिला गेला नाही. २०२१ मध्‍ये १९.८७ कोटी रक्‍कम बोनसच्‍या स्‍वरूपात मजूरांना देण्‍यात आली. २०२२ मध्‍ये रॉयल्‍टीच्‍या स्‍वरूपात ७२ कोटी इतकी रक्‍कम जमा झाली आहे. मात्र यापुढे या रकमेतुन प्रशासकीय खर्च न करता ही पूर्ण रक्‍कम मजूरांना बोनसच्‍या स्‍वरूपात देण्‍यात येणार असल्‍याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले. आता जवळपास चौपट रक्‍कम बोनसच्‍या स्‍वरूपात मजूरांना मिळणार आहे.

स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षाच्‍या निमीत्‍ताने वनक्षेत्रात राहणा-या तसेच पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करणा-या तेंदूपत्‍ता मजूरांना आर्थिकदृष्‍टया स्‍वयंपूर्ण करण्‍याच्‍या दृष्‍टीने हा निर्णय घेण्‍यात येत असल्‍याचे वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले. २०२१ चा तेंदूपत्‍ता बोनस येत्‍या दोन महिन्‍यात मजूरांना मिळेल अशी व्‍यवस्‍था करण्‍यात येईल, असेही ते म्‍हणाले.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

मिरा भाईंदर: माणसाला माणूस बनवण्याचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे वर्षावास: भदंत शांतिरत्न यांचे प्रतिपादन.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- जगाला बुद्ध धम्माशिवाय…

39 mins ago

पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट ग्रुप तर्फे शहीद नितीन पुट्टेवार यांना वाहली श्रद्धांजली.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय चौधरी वॉर्ड हिंगणघाटचे…

1 hour ago

हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…

2 hours ago

पुलगाव येथे सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यावर स्थानीक गुन्हे शाखेची धडक कारवाई, लाखोंचा माल जप्त.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा…

2 hours ago

सांगली सेवक कामगार संघटने कडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाबत घेतली भूमिका.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व संघटित आरोग्य…

2 hours ago

चंद्रपूर: वाहनासह 35 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित माल जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र…

3 hours ago