नागा साधूने दोन नागरिकाच्या पळवल्या सोन्याच्या चेन. पोलिसांचा शोध सुरू.

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक :- नाशिक येथून नागा साधूनी दोन वेगवेगळ्या घटनेत दोन लोकांच्या सोन्याच्या चेन चोरल्याचा खळबळ उडवून देणाऱ्या घटना समोर आल्या आहे. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तोतया नागा साधूने एका वृद्धाच्या गळ्यातील सोन्याची चेन ओरबाडून नेली, तर दुसर्‍या घटनेत सोन्याच्या चेनमध्ये रुद्राक्ष लावून देण्याच्या बहाण्याने लबाडीने चेन नेल्याची घटना मंगळवारी दि.23 सकाळी घडली. या प्रकरणी म्हसरूळ व मुंबई नाका पोलिस ठाण्यात जबरी चोरी व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्ध्या तासात घडलेल्या दोन घटनांमुळे तोतया नागा साधूंचा धुमाकूळ समोर आला आहे.

भगीरथ रामचंद्र शेलार वय 69 वर्ष , रा. दिंडोरी रोड हे मंगळवारी दि.23 सकाळी 6.15 वाजताच्या सुमारास किशोर सूर्यवंशी मार्गावरून जात होते. त्यावेळी ओमकारनगर परिसरात पांढर्‍या रंगाच्या कारमधून चार संशयितांपैकी एकाने भगीरथ यांना त्र्यंबकेश्वरकडे जाण्याचा मार्ग विचारला. त्याचवेळी कारमधून एक निर्वस्त्र संशयित खाली उतरला. तो नागा साधू म्हणून वावरत होता. त्याने शंभर रुपये व रुद्राक्षाचा मनी देऊन आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने भगीरथ यांच्या गळ्यातील 35 हजार रुपयांची 12 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन ओरबाडून नेली. या प्रकरणी भगीरथ यांनी म्हसरूळ पोलिस ठाण्यात जबरी चोरीची फिर्याद दाखल केली आहे. तर दुसर्‍या घटनेत उत्तम रामचंद्र परदेशी वय 75 वर्ष रा. गोविंदनगर, लिंक रोड हेदेखील मंगळवारी सकाळी 6.45च्या सुमारास आर. डी. सर्कलजवळून पायी जात असताना पांढर्‍या रंगाची कार आली. कारमधून निर्वस्त्र व्यक्ती खाली उतरला. त्याच्यासोबत एक महिला व एक पुरुषही होता. त्यांनी उत्तम परदेशी यांना पंचवटीकडे जाण्याचा मार्ग विचारत बोलण्यात गुंतवून ठेवले. तोतया नागा साधूने परदेशी यांना त्यांच्याकडील सोन्याच्या चेनमध्ये रुद्राक्ष लावून देतो तुमचे कल्याण होईल, असे सांगितले. त्यामुळे परदेशी यांनी त्यांच्याकडील दोन तोळे वजनाची सोन्याची चेन तोतया नागा साधूस दिली. त्यानंतर नागा साधू व इतर संशयित कारमधून निघून गेले. काही वेळानंतर परदेशी यांना त्यांच्याकडील सोन्याची चेन नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी मुंबई नाका पोलिस ठाणे गाठून संशयितांविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

8 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

9 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

9 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

9 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

9 hours ago

अभिनव विचार मंच तर्फे सोपानदादा कनेरकर यांचा कौटुंबिक प्रबोधन जागर जाणिवांचा कार्यक्रमाचे 25 डिसेंबर रोजी आयोजन.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…

9 hours ago