अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकुण ७,३८,८००/- रुपये किंमतीचा २९ किलो गांजा केला जप्त…

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

अंमली पदार्थ विरोधी पथक पिंपरी चिंचवड शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पिंपरी चिंचवड शहरामध्ये चोरून व होणारा अंमली पदार्थ, ड्रग्स विक्री, साठवणुक च वाहतुकीस पुर्णपणे प्रतिबंध व्हावा करीता मा. पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे सो यांनी सुचना दिल्या होत्या त्यानुसार मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्रीमती स्वप्ना गोरे सो व मा. सहाय्यक पोलीस आयुका गुन्हे-१ श्री बाळासाहेब कोपनर सो व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सतिश पवार, अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या व मार्गदर्शन केले होते.

त्याप्रमाणे दि. १८/०६/२०१३ रोजी अगली पदार्थ विरोधी पथकाकडील वपोनि श्री. सतिश पवार, पोउपनि श्री ज्ञानेश्वर दळवी, पोलीस उप-निरीक्षक राजन महाडीक व पोलीस अंमलदार असे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना पोलीस अंमलदार सदानंद रुद्राक्षे व रणधीर माने यांना त्याचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शंकरवाडी, तळेगाव दाभाडे ता. मावळ जि. पुणे येथे लडकत इंडियन ऑईल पेट्रोल पंप शेजारील मोकळ्या जागेत येथे एक इसम मुंबईवरून गांजा विक्रीसाठी आला आहे. • अशी खात्रीशीर बातमी मिळाल्या वरुन आम्ही सदर ठिकाणी छापा टाकला असता, सदर ठिकाणी इसम नामे मनोज शंकरलाल प्रजापती वय २७ वर्षे रा. वर्धना बँकेजवळ, कळंबोली पनवेल मुळगाव मनादर तहिसल सिगवद जि.सिरोई राज्य राज्यस्थान याचे ताब्यातुन एकुण ७,३८,८००/- रु. किं.चा २९ किलो १५२ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ व मोबाईल जप्त करण्यात आला आहे. त्याचे ताब्यात मिळुन आलेला गांजा हा इसम नामे शिवा सिमलीगोडा राज्य ओडिसा पुर्ण नाव पत्ता माहिती नाही याचेकडुन आणला असल्याचे सांगितल्याने सदर इसमांविरुध्द विरुध्द तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईमध्ये ०१ आरोपी अटक करुन त्यांचेकडुन एकुण ७,३८,८००/- रु. किं.चा २९ किलो १५२ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ व मोबाईल जप्त केला आहे.

सदरची कामगीरी ही मा. पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे साो, मा. सह पोलीस आयुक्त श्री. डॉ. संजय शिंदे, मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्रीमती स्वप्ना गोरे रसो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-1 श्री. बाळासाहेब कोपनर यांचे मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सतिश पवार, सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत महाले, पोउपनि श्री ज्ञानेश्वर दळवी, पोलीस उप-निरीक्षक राजन महाडीक व पोलीस अंमलदार, पोहवा प्रदिप शेलार, पो.हवा. दिनकर भुजबळ, पो.हवा. आनंद बनसोडे, पो.हवा. संतोष दिघे, पो.ना. संतोष भालेराव, पो.ना. अजित कुटे, पो.ना. प्रसाद कलाटे, पो.ना. विजय दौंडकर, पो.शि. प्रसाद जंगीलवाड, पो. शि. रणधीर माने, पो.शि. सदानंद रुद्राक्षे, पो.शि. कपिलेश इगवे यांनी केली आहे..

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

आता लाडका पत्रकाराचा नंबर लागेल का ! महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लक्ष देतील का ?

देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…

5 hours ago

नाशिक: पती पत्नीने गळफास लावून आत्महत्या, 10 वर्षीय चिमुकली मुलगी सुद्धा पलंगावर मृतावस्थेत.

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…

5 hours ago

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व. शरद काळे यांचा स्मृति दिन साजरा.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…

6 hours ago

कवठा येथील सरपंच प्रवीण जायदे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.

खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…

6 hours ago

सिंदी तहसील कार्यालय वर विविध मागण्यासाठी कामगार नेते डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

6 hours ago