आमच्या गावाला वाचवा हो, अशी पुकार घेऊन चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या शेकडो महिला.

हनिशा दुधे, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- वेकोलीने नदीपात्रालगत उभारलेल्या मातीच्या ढिगाऱ्यांमुळे गावाला पुराचा धोका निर्माण झाला आहे.मागील वर्षी पुरामुळे गावाचे मोठे नुकसान झाले. पुराच्या पाण्यातून वाहून आलेल्या राखेमुळे शेती नापिक झाली आहे. शासन स्तरावर वेळोवेळी निवेदने दिली. लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी गावाला भेट दिली. केवळ आश्वासनापलिकडे काहीच झाले नाही. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात तरी पुराच्या पाण्यापासून गावाचा वाचवा, या मागणीसाठी भद्रावती तालुक्यातील पिपरी दे. येथील महिलांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक दिली. दरम्यान, विविध मागण्यांचे निवेदनही यावेळी देण्यात आले.

गावात नदीकाठावर वेकोलीने मोठमोठे मातीचे ढिगारे उभारले आहेत. या ढिगाऱ्यांमुळे पावसाळ्यात नदीचे पाणी गावात शिरते. मागील वर्षी पुरामध्ये गावातील दोघांचा जीव गेला. शेकडो एकर जमिनीचे नुकसान झाले. बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरात पाणी घुसून मोठे नुकसान झाले. जनावरांचा चारासुद्धा खराब झाला होता. यानंतर शासन, प्रशासन जागे झाले आणि गावात दौरे केले. लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी पूर परिस्थितीबाबत कायम उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. वर्ष उलटले मात्र अजूनही काहीही उपाययोजना झाल्या नाही. उलट मातीचे ढिगारे वाढतच आहे.

गावातील ग्रामस्थांनी आजपर्यंत प्रशासनाला अनेक निवेदन दिले. मात्र न्याय मिळालाच नाही. त्यामुळे गावातील महिलांनी एकत्र येत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय गाठले होते. ते गावकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार अस वाटत होते. मात्र, जिल्हाधिकारी उपस्थित नसल्याने अन्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी सरपंच संदीप खुटेमाटे यांच्यासह शेकडो महिलांची उपस्थिती होती.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

आता लाडका पत्रकाराचा नंबर लागेल का ! महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लक्ष देतील का ?

देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…

9 hours ago

नाशिक: पती पत्नीने गळफास लावून आत्महत्या, 10 वर्षीय चिमुकली मुलगी सुद्धा पलंगावर मृतावस्थेत.

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…

9 hours ago

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व. शरद काळे यांचा स्मृति दिन साजरा.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…

10 hours ago

कवठा येथील सरपंच प्रवीण जायदे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.

खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…

11 hours ago

सिंदी तहसील कार्यालय वर विविध मागण्यासाठी कामगार नेते डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

11 hours ago