जिवती येथील विदर्भ कोंकण बँक येथे आदिवासी कोलाम बांधवांचा पिक कर्जासाठी कुलूप बंद आंदोलन.

बॅंकेने पीक कर्ज देतो म्हणून आमची आर्थिक लूट केल.

संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण

चंद्रपूर:- सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की, वनहक्क पट्टे धारकांनी मांडली व्यथा तिन महिन्यापासून बँकेचे उंबरठे झिजवून सुद्धा हाती नाही पीक कर्जाची रक्कम जिवती तालुक्यातील काकबन, भुरियेसापूर, टाटाकोहाड, सिंगरपठार, शेडवाही येथील वनहक्क पट्टे धारक जिवती येथील विदर्भ कोंकण ग्रामिण बँकेत तीन महिन्यापासून उंबरठे झिजवीत आहेत.मात्र बँकेचे व्यवस्थाक दिडवलकर यांना काही देने घेणे नसल्याचे चित्र आहे.

मागील तीन महिन्यापासून बँकेचे उंबरठे झिजवीत असून यात आमचे प्रचंड पैसे गेले असून बँकेला स्टॅम्पपेपर, नादेय प्रमाणपत्र, सर्व कागदपत्रे देऊन सुद्धा पीक कर्ज दिल्या जात नाही यामुळे या बँकेने आमची आर्थिक लूट केली असल्याचे पर्वताबाई कांशीराम चाहकाटी या वनहक्क धारक महिलेने आपली व्यथा मांडली. यावेळी बँकेच्या गेटला कुलूप लावून कुलूप बंद आंदोलन करण्यात आला यामुळे व्यावस्थापकांनी पोलिसांना बोलविले.

बँकेत वनहक्क धारकांना पिक कर्जाच्या मागणीसाठी अफ्रोट संघटनेचे डॉ. मधुकर कोटनाके, श्रमिक एल्गारचे घनश्याम मेश्राम, बिरसा क्रांती दलाचे संतोष कुलमेथे यांच्या नेतृत्वात वनहक्क धारकांना घेऊन ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले असून पीक कर्ज मिळेपर्यंत बँकेतून जाणार नाही अशी भूमिका घेतल्याने बँकेच्या व्यवस्थापकाची तारांबळ उडाली व्यवस्थापकांनी चंद्रपूर येथील त्यांचे अधिकारी खाडे यांना फोन करून प्रकरणाचे गांभीर्य कळविले आहे खाडे यांनी चंद्रपूर येथून जिवतीला येऊन प्रश्न सोडविण्याची तयारी दर्शविली असून पिक पिक कर्ज न दिल्यास बँकेसमोर पेंडाल टाकून बेमुदत आंदोलन सुरू करणार असल्याची भूमिका डॉ. मधुकर कोटनाके यांनी घेतली आहे.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

मिरा भाईंदर: माणसाला माणूस बनवण्याचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे वर्षावास: भदंत शांतिरत्न यांचे प्रतिपादन.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- जगाला बुद्ध धम्माशिवाय…

5 hours ago

पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट ग्रुप तर्फे शहीद नितीन पुट्टेवार यांना वाहली श्रद्धांजली.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय चौधरी वॉर्ड हिंगणघाटचे…

5 hours ago

हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…

6 hours ago

पुलगाव येथे सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यावर स्थानीक गुन्हे शाखेची धडक कारवाई, लाखोंचा माल जप्त.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा…

6 hours ago

सांगली सेवक कामगार संघटने कडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाबत घेतली भूमिका.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व संघटित आरोग्य…

7 hours ago

चंद्रपूर: वाहनासह 35 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित माल जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र…

7 hours ago