रत्नु कांबळे, सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी
कणकवली:- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वागदे येथून एक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. एका कंटेनरची समोरुन येणाऱ्या कारला धडक दिली, धडक इतकी भीषण होती की कार पूर्ण चकनाचुर झाली त्यात चालकाचा जागीच मृत्यू झाला.
कणकवली महामार्गावरून गोव्याच्या दिशेने मालवाहतूक करणार्या कंटेनरची समोरून येणाऱ्या कारला वागदे येथे जोरदार धडक दिली. या अपघातात कार चालक जागीच ठार झाला. प्रशांत प्रभाकर सावंत वय 47 वर्ष, राहणार नरडवे, सध्या रा. कणकवली असे मृत कार चालकाचे नाव आहे.
कणकवली येथील गडनदी पुलानजीकच्या वळणावर आज, शुक्रवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गडनदी पुलापुढे वागदे गावाच्या हद्दीत महामार्गाची एक लेन बंदावस्थेत आहे. येणारी – जाणारी वाहने एकाच लेनवर येत असल्याचे सातत्याने अपघात घडत असतात. या अपघातालाही महामार्ग प्राधिकरणचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे, असा आरोप गावातील नागरिकांनी केला. जोपर्यंत ही बंद लेन सुरू केली जात नाही तोपर्यंत मृतदेह उचलायला देणार नाही, असा पावित्रा गावकऱ्यांनी घेतला होता.
या भीषण अपघाताची माहिती प्राप्त होताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील कारवाई पोलिस करत आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…