अक्षय जाधव पुणे शहर प्रतिनिधी
भोसरी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे सो यांचे आदेशानुसार पिंपरी चिंचवड आयुक्तालयात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. भोसरी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला माहिती मिळाली की एक इसमाने पांच बंगला, एस. टी. रोड, दापोडी परिसरात गांजा हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आणला आहे. सदर ठिकाणी भोसरी पोलीसांनी पाच बंगला एस.टी. रोड, दापोडी, पुणे येथील पी.डब्ल्यु.डी.च्या स्टिल वार्डयेथे जावून खात्री केली त्यावेळी बातमीच्या वर्णनाचा एक इसम संशयीतरित्या थांबलेला दिसला. पोलीसांची चाहुल लागताच तो तेथील पडक्या रूममध्ये शिरला त्यावेळी पोलीसांनी त्याला चौहुबाजुनी घेरून तो लपुन बसलेल्या खोलीत जावुन तो आरोपी नामे ओमकार महादेव लिंगे, वय २५ वर्षे, रा. पाच बंगला, घर नं.११, एस. टी. रोड, दापोडी, पुणे याला ताब्यात घेतले, त्यावेळी त्याची व तो थांबलेल्या खोलीची झडती घेतली असता ९ किलो ६२२ ग्रॅम वजानाचा गांजा, २३६० देशी दारू देंगो पंचच्या बाटल्या ९०० मोकळ्या बाटल्या, लेबले व बाटल्याची झाकणे, १४० लिटर गावती हातभट्टीची दारू मिळुन आली. पोलीसांनी सदर ठिकाणावरुन वरील प्रमाणे एकूण ३,५५५४१/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याचेविरुध्द एन.डी.पी.एस. अॅक्ट, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम व भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यास दाखल गुन्ड्याचे तपास कामी अटक करून त्याचेकडे तपास केला असता तो गावठी हातभट्टीची दारू मोकळ्या बाटलीमध्ये भरून त्याला लेबल व सिल लावुन ती बनावट देशी दारू गो पंच नावाने विकत असल्याचे निष्पन्न झाले आहे. भोसरी पोलीस अधिक उपास करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, मा पोलीस सह आयुक्त श्री. डॉ. संजय शिंदे, मा. अपर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी, मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ १ श्री. विवेक पाटील, ना. सहाय्यक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग श्री. सतीश कसबे सो वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भास्कर जाधव यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक कल्याण घाडगे, पोलीस उप-निरीक्षक मुकेश मोहारे, तसेच सहा. पोलीस फौजदार राकेश बोयणे, संजय चव्हाण, पोलीस अंमलदार सचिन गारडे, मछिद्र बांबळे, राजेंद्र राठोड, नवनाथ पोटे, सागर जाधव, सचिन सातपुते, प्रभाकर खाडे, संतोष महाडीक, मार्तंड बांगर, स्वामी नरवडे, महिला अंमलदार प्रतिभा मुळे, सुषमा पाटील यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…