जळगाव: रीतिरिवाजाने विवाह झाला.. मग पती पत्नी रूममध्‍ये गेले अन्‌ एका क्षणात पतीच्या पायाखालची जमीनच सरकली.

ईसा तडवी, जळगाव उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जळगाव:- आज लग्न म्हटलकी नवविवाहित पती पत्नीच्या नवजीवनाला सुरुवात होते. पण जळगाव येथून विविहाच्या नावावर चक्क मुलाची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

जळगाव येथील एका मुलाची सोशल माध्यमावरील फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली. त्यानंतर काही दिवसांनी लग्‍नाची मागणी करण्यात आली आणि समोरील तरूणी कडून लग्‍नास होकार मिळाला व रीतिरिवाजाने थाटात लग्‍नही झाले. परंतु, लग्‍नानंतर धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. आपण जिच्यासोबत लग्न केलं पत्नी म्हणून स्वीकारलं ती महिला नाही, तर चक्क तृतीयपंथीय असल्याचे समोर आल्यानंतर त्या नवविवाहित तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली.

तृतीयपंथी असताना मुलगी असल्याच सांगून लग्न करणाऱ्या तृतीय पंथीविरुद्ध प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश बुधवारी (ता. 5) रोजी दिले. हा धक्कादायक प्रकार न्यायालयीन निवाड्याने समोर आल्यामुळे खळबळ उडाली असून, सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर थेट विवाहाचा निर्णय अंगाशी कसा येऊ शकतो, याबाबत विचार करायला लावणारा हा प्रकार आहे.

झटपट उरकला विवाह….
जळगाव शहरातील कांचननगर चौगुले प्लॉटमधील मूळ रहिवासी शुभम संजय पाटकर वय 26 वर्ष तो खासगी नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. 14 मार्च 2023 रोजी शुभम मोबाईल बघत असताना त्याच्या फेसबुक अकाउंटवर दिव्या पाटील नावाने मुलीची ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ आली. ती त्याने स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. त्यानंतर लग्नाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आणि झटपट 15 दिवसांच्या आत नवरा मुलगा शुभम पाटकर याच्या वाढदिवसाचा मुहूर्त पाहून परिचितांच्या उपस्थितीत दोघांचा रीतिरिवाज लग्न झाल.

..अन्‌ पायाखालची जमीन सरकली.
विवाहित जीवन सुरू करण्या अगोदर नवदांपत्याचे देवदर्शन घेतले. सर्व विवाह संस्कार रीतिरिवाजाने पार पडले. नवी सून घरी आल्यामुळे पाटकर कुटुंबाचा आनंद गगनाला भिडला असतानाच अचानक त्यांच्या आनंदावर विरजण पडले. पाटकर कुटुंब आणि नातेवाइकांनी नवदांपत्याच्या मधुचंद्राची तयारी केली, खोली सजविली. जोडपे आत गेल्यावर पत्नी म्हणून शुभमने जवळ जाण्याचा प्रयत्न केला असता, दिव्याने मला त्रास होतोय, असे सांगून शिव्या देत त्याला खोलीबाहेर काढले. लग्न करून आणलेली व्यक्ती मुलगी नसून ती चक्क तृतीयपंथी असल्याचे समजल्यावर पाटकर कुटुंबीयांना धक्का बसला व त्यांनी मदतीसाठी पोलिस ठाणे व न्यायालयात धाव घेतली. पीडित कुटुंबीयांकडून ॲड. केदार भुसारी यांनी न्यायालयात तक्रार केली.

गुन्हा दाखल करण्याचे आदेश…
हा सर्व घडलेला प्रकार शुभम पाटकर व कुटुंबीयांनी पोलिस अधीक्षकांसह रामानंदनगर पोलिसांत लेखी फसवणुकीची तक्रार दिली. त्यानंतर संशयित दिव्याबाबत उपलब्ध पुरावे आणि डॉक्टरांचा वैद्यकीय अहवाल, सोशल मीडियावरील संशयिताच्या गैरवर्तनाचे दस्तऐवज अशांसह न्यायालयात दाद मागितली. प्रथम वर्ग न्यायाधीश आर. वाय. खांडरे यांच्या न्यायालयाने पोलिसांना तपास करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

आर्वित विद्यमान आमदार दादाराव केचे यांनी फडणवीस यांचे विश्वासू वानखेडे यांचा केला गेम? भाजपात विविध चर्चेला उधाण.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…

11 hours ago

अहेरी विधानसभेतील राजाराम, खांदला पोलीस स्टेशन हद्दीत मतदान केंद्रावर पोलिसांचा चोक बंदोबस्तात शांततेत पार*

*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…

1 day ago

राजुरा विधानसभा संघात पुनागुडा मतदान केंद्रावर मतदानाच्या टक्केवारीत वाढ 63 टक्के मतदान.

राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

1 day ago

Secure Specialized Papers Writing Guidance Using OnlineClassHelp Essay Writing Services

Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…

2 days ago