राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात राजकीय भूकंप सुरू आहे. कोण कधी कोणा बरोरीबर गाठ बांधेल कुणी सांगू शकत नाही. शिंदे फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सामील झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटात अस्वस्था असल्याची चर्चा आहे. अशातच उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटातील 8 ते 10 आमदारांनी प्रत्यक्ष संपर्क साधल्याचा दावा केला आहे. राऊतांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद बोलताना हा दावा केला आहे. ते म्हणाले, ज्या दिवशी राष्ट्रवादीचे नेते युती सराकरामध्ये सामिल झाले, त्याच दिवशी शिंदे गटातील आमदारांनी उडी मारण्याच्या तयारी केली. काही जणांनी मातोश्रीने साद घातली तर प्रतिसाद देवू असे जाहीरपणे बोलून दाखवले तर काही आमदारांनी पुन्हा परत येण्यासाठी प्रत्यक्ष संपर्क साधला असा खळबळजनक दावा विनायक राऊत यांनी केला आहे.
राऊत म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून अनेक निरोप आले. त्यांनी मातोश्रीची श्रमा मागावी आणि तिथं परत जावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. 8 ते 10 आमदारांनी प्रत्यक्ष संपर्क साधला आहे. गद्दारांना परत घेवू नये अशी पक्षातील पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे. परंतू, अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेतील असे देखील राऊत म्हणाले.
महाराष्ट्राकडे तुच्छतेने पाहत आहेत: राऊत राज्यातील राजकीय घडामोडीवर भाष्य करण्यासाठी शब्दच नाही. गलिच्छ राजकारण सुरू आहे. किळसवाणे राजकारण, फुटीचा काळीमा यामुळे छत्रपतींच्या महाराष्ट्राची बदनामी झाली आहे. कुटुंब फुटीचा काळीमा आणि ज्याने आपल्याला अन्न दिले, राजकीय पुनर्वसन केले, त्यांच्यावर गलिच्छ आरोप करण्याचा प्रकार यामुळे महाराष्ट्राकडे सर्वच तुच्छतेने पाहत आहेत, असे देखील विनायक राऊत म्हणाले.
मनसे शिवसेने एकत्र येणार काय? मनसे आणि शिवसेना यांनी एकत्र यावं या आशयाचे बॅनर्स मुंबई, ठाणे आणि पुण्यात लागले आहेत. याबाबत प्रश्न विचारला तेव्हा विनायक राऊत म्हणाले, अनेक ठिकाणी बॅनर्स लागले आहेत, पण अद्याप अशी कोणताही चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…