फुरसुंगी येथील दारूचे गोडावूनची भिंत फोडून नेलेले दारूचे बॉक्स, ट्रक, पिकअप असा किं. रु ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त.

दशरथ गायकवाड, पुणे प्रतिनिधी

फिर्यादी संतोष लहु केशवे मैनेजर- वाईन एन्टरप्रायझेज प्रा लि. श्रीनाथ वेअर हाऊसिंग पुणे सासवड रोड पुणे यांनी दि.०६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास शनिवारी नेहमी प्रमाणे वाईन एन्टरप्रायझेज प्रा लि. श्रीनाथ वेअर हाऊसिंग पुणे सासवड रोड पुणे येथील गोडावून मध्ये दिवस भरात येणारा दारूचे बॉक्सचा माल उतरवुन घेवुन तो सप्लाई करून गोडावून बंद करुन घरी निघुन गेले होते. रविवारी सुट्टी असल्याने गोडावून बंद असते. दि.०८/०८/२०२२ रोजी सकाळी ०९/०० सुमारस नेहमी प्रमाणे वाईन एन्टरप्रायझेज प्रा लि. श्रीनाथ वेअर हाऊसिंग पुणे सासवड रोड पुणे येथील गोडावून परती येवून गोडावून उघडले असता, गोडावून मधील माल अस्ताव्यस्त पडलेला दिसला तसेच मागिल मित फोडून प्रवेश केलेला दिसला. तेंव्हा गोडावून मध्ये चोरी झाली असल्याचे लक्षात आले. सीसीटीव्ही या डिव्हीआर हा कादुन नेला होता त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नव्हते. दुकानामधिल रॉयल स्टैग, इम्पेरियल ब्ल्यू ब्लेन्डर या कंपन्याचे दारूचे ३०२ बॉक्स कि.रु २५,४३,२०३/- चे घरफोडी चोरी करून नेल्याने हडपसर पोलीस ठाणेस गु.र.नं. ८९६ / २०२२ भा. दं. वि.क ४५४, ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास, तपास पथक प्रमुख विजयकुमार शिंदे यांच्याकडे देण्यात आला. गुन्ह्यातील आरोपींनी दारूचे गोडावून मध्ये असणारे सीसीटीव्ही फुटेज चा डीव्हीआर चोरून नेल्याने आरोपी बाबत काहीएक माहीती उपलब्ध नव्हती. गुन्हा शनिवारी सायंकाळी ६.०० ते सोमवारी सकाळी ०९.०० चे दरम्यान झालेला असल्याने गुन्ह्याची निश्चित वेळ कोणती याचाही अंदाज येत नव्हता. त्यामुळे सुरवातीस चारचाकी वाहनांचा वापर झाला असेल व रात्रीच्या वेळीच हा गुन्हा केला असावा या दोन गोष्टी आधारभूत धरून त्याआधारे तपास करण्याचे नियोजन केले.

तपास पथकातील अधिकारी व अमलदार यांनी घटनास्थळी जावून गुन्ह्याचे ठिकाणची पाहणी करता, फिर्यादी यांचे गोडावून चे पाठीमागील बाजुने भिंत फोडून आत प्रवेश केला असल्याने तसेच मागिल भिंतीपासून काही फुट अंतरावर पॉवर हाऊस फुरसुंगी गावाकडे जाणारा असा दुतर्फा रोड असून, त्या रोडला लागुन असलेली भिंत देखील थोड्या फार प्रमाणात फोडली असल्याचे दिसून आले. सदर ठिकाणी गोडावून मधिल काही दारूचे बॉक्स फोडून दारूचे बाटल्या पडलेल्या दिसून आले. यावरून गुन्ह्याची पध्दत लक्षात आली की, आरोपींनी पाठीमागील बाजुन आत प्रवेश केला तसेच रोडला लागुन असलेल्या भिंतीचा आसरा घेवून त्या मितीस आडवी कोणतीतरी मोठी चार चाकी गाडी लावून त्याआधारे गोडावून मधिल दारूचे बॉक्स लोड करून माल घेवून गेला असल्याचा कयास बांधला.

त्याआधारे फुरसुंगी पॉवर हाऊस ते फुरसुंगी गाव असा एक रोड, फुरसुंगी पॉवर हाऊस से सासवड कडे जाणारा एक रोड. फुरसुंगी पॉवर हाऊस ते हडपसर कडे जाणारा रोड, आणि मंतरवाडी चौक ते हांडेवाडी रोड, या भागातील १५० पेक्षा जास्त सीसीटीव्हीची तपासणी केली. परंतु सुरवातीस त्यामध्ये यश आले नाही. परंतु त्यानंतर गुन्ह्याचे घटनास्थळी आलेले वाहन किमान ३० मिनीट एकाच जागेवर थांबले असेल व नंतर ते पुढे गेले असेल ही शक्यता गृहीत धरली व पुंन्हा घटनास्थळाचे बाजुस असलेल्या चारही दिशांचे दिनांक ०७/०८/२०२२ रोजीचे ००.०० ते ०५.०० चे फुटेजची पाहणी केली त्यामध्ये संशयीत हालचाल तपासपथकास मिळून आली. मिळून आलेल्या माहीतीचा धागा पकडून पुढे, फुरसुंगी गावठाण ते लोणीकाळभोर टोल नाका तसेच लोणी काळभोर टोल नाका ते पाटस टोल नाका परिसरातील २०० पेक्षा जस्त सीसीटीव्ही फुटेज पाहणी केले. मग पुढे सासवड रोड ते सोलापूर हायवे इतपर्यंतच्या भागातील फुटेज पाहणी करत आरोपींचा सुगावा तपास पथकाला मिळून आला.

दिनांक १५ ऑगस्ट रोजी मा. पोलीस उप आयुक्त सो परिमंडळ- ५ पुणे शहर यांचे आदेशाने हडपसर पोलीस ठाणेतील तपास पथकाची एक टिम त्यामध्ये पोलीस अंमलदार सुशील लोणकर, शाहिद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार असे तपासकामी उस्मानाबाद भागात रवाना झाले. नमुद तपासपथकाने दिनांक ११ ऑगस्ट ते१४ ऑगस्ट रोजी पर्यंत उस्मानाबाद भागातील कळंब, कन्हेरगाव, पांगरी, तेरखेडा, देवधानोरा पारडा, तरखडा, पारधीफाटा या भागात गावातील परिसराची रेकी करून आरोपींबाबत माहीती घेतली असता सदरचा गुन्हा हा बिभीषण काळे व त्याचे साथीदार यांनी केला असल्याचे निष्पन्न करून आरोपींची नावे निष्पन्न केली. दिनांक १४/०८/२०१२ रोजी मा. पोलीस उप आयुक्त सो परिमंडळ-५ पुणे शहर यांचे आदेशाने हडपसर पोलीस ठाणेतील तपास पथकाची दुसरी टिम त्यामध्ये पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, सुरज कुंभार, अनिरूध्द सोनवणे, अतुल पंधरकर असे उस्मानाबाद येथे गेले. तपास पथकातील टिमने आरोपी नामे १) आतिश ऊर्फ पिल्या विश्वनाथ बोंदर वय २६ वर्ष रा. मु.पो. उकडगाव ता. बार्शी जि. सोलापूर २) सागर ऊर्फ दाद्या शिवाजी मस्तुद वय २८ वर्ष रा. मु.पो. पांगरी ता. बार्शी जि.सोलापूर ३) तानाजी भागवत चौघुले वय ३८ वर्ष रा. मु.पो. पारडी ता. बार्शी जि. सोलापूर यांना गुन्ह्यात ताब्यात घेवून त्याचेकडे चौकशी केली.

आरोपीकडे गुन्हयाबाबत अधिक चौकशी केली असता तपासातील हकीगत अशी की, आरोपी यांनी पाहीजे आरोपी बिभीषण काळे रा. कन्हेरपाटी ता. कळंब जिल्हा उस्मानाबाद आणि सोन्या काळे व त्यांचे इतर साथीदार असे मिळून पुणे येथील दारूचे गोडावून लुटण्याचे ठरवीले. त्यानुसार दिनांक ३०/०७/२०२२ रोजी दुपारच्या सुमारास विभीषण काळे हा फुरसुंगी येथे आला होता व त्याने ठिकाणाची पाहणी केली होती. त्यानुसार दिनांक ०६/०८/२०२२ रोजी सर्व जण पहाटेच्या वळेस येरमाळा जिल्हा उस्मानाबाद येथे जमा होवून चौफुला दौड येथील रोडलगत असलेल्या दाव्यावर थांबले. त्यानंतर विभीषण काळे हा फुरसुंगी, हडपसर येथे दुपारच्या वेळेस येवून पुन्हा पाहणी केली व परत ढाब्यावर आला, त्यानंतर सर्व जण मिळून रात्री १२.०० च्या सुमारास फुरसुंगी येथील गोडावून जवळ येवून दारूचे गोडावून फोडून रस्त्याचे बाजुला असणाऱ्या मितीलगत ट्रक लावून तेथील मित फोडून दारूचे बॉक्स घेवून गेली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

आरोपींनी कन्हेरवाडी आणि आंदोरा या दोन्ही गावांच्या शिवरस्त्या मध्ये असलेल्या ऊसाच्या शेतात माल घरफोडी चोरी करून नेलेले दारूचे बॉक्स हे लपवून ठेवले होते. ते त्यांचेकडून जप्त करण्यात आले आहेत. आरोपीकडून आतापर्यंत किं. रु ४९.२६.००८ माल जप्त केला असून त्यामध्ये किं.रु ९.२६.००८/- चे दारूचे ११० बॉक्स त्यामध्ये इंम्पेरिअल ब्ल्यु आणि रॉयल स्टॉगची दारू तसेच गुन्ह्याकरीता वापर झालेला ट्रक व महिंद्रा पिक अप असा माल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्यातील पाहीजे आरोपी विभीषण काळे हा उस्मानाबाद येथील पोलीसांच्या रेकॉर्डवरिल गुन्हेगार असून त्याचे विरूध्द चोरी, जबरी चोरी, घरफोडी, खुन, सरकारी नोकरावर हल्ला असे एकुण ९ गुन्हे दाखल आहेत. उर्वरीत आरोपी यांचा शोध चालु असून त्यांचेकडून अशा प्रकारचे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

सदरची कामगिरी ही श्री. नामदेव चव्हाण सो, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे व नम्रता पाटील सो. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ पुणे शहर यांचे मागदर्शनाखाली बजरंग देसाई सो सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे श्री. अरविंद गोकुळे सो वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री दिगंगर शिंदे सो, पोनि (गुन्हे) श्री. विश्वास डगळे साो पोनि (गुन्हे) यांचे सूचनाप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, सचिन गोरखे, सुरज कुंभार भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, अतुल पंचरकर यांचे पथकाने करून प्रशंसनीय कामगिरी केली आहे. अरविंद गोकुळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस ठाणे पुणे शहर.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

2 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

13 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

14 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

14 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

14 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

14 hours ago