सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
चंद्रपूर:- जील्हातील सावली तालुक्यातील असोलामेंढा गोसेखुर्द येथून एक हृदय हेलावणारी बातमी समोर येत आहे. गोसेखुर्द नहरात बुडत असलेल्या आपल्या भावाला वाचविण्याच्या प्रयत्नात बहिणीला दुर्दैवी जलसमाधी मिळाली आहे. ही घटना 26 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. काजल अंकुश मक्केवार वय 11 वर्ष असे मृतक बहिणीचे नाव आहे. पोळ्याच्या दिवशीच घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
असोलामेंढा तलावाच्या नहराद्वारे सावली तालुक्यातील शेतीला सिंचनाकरिता पाणी पुरवठा केल्या जातो. याच नहराला लागूनच गावातील वस्ती आहे. या गावातील महिला कपडे धुण्यासाठी नहरावर जातात. दरम्यान, शुक्रवारला सकाळी 10 वाजताच्या सुमारास काजल व तिची बहीण सुस्मिता या दोघ कपडे धुण्यासाठी नहरावर गेल्या होत्या. त्यांच्या मागे चवथ्या वर्गात शिकत असलेला भाऊ राहुल मक्केवार व त्याचा मित्र रोहित मिटपल्लीवार, अनुराग मिटपल्लीवार हेसुध्दा तेथे आले. नहराच्या पायरीवर खेळत असताना राहुलचा अचानक तोल जाऊन तो नहरच्या पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी काजल, सुस्मिता, रोहित, अनुराग यांनी नहरात उडी घेतली. परंतु, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ते सर्वच पाण्यात वाहून जाऊ लागले. ते वाहत असताना नहराजवळ असलेल्या सुजाता संजय मिटपल्लीवार हिने आरडाओरड करून जवळपास असणार्या नागरिकांना बोलाविले असता संतोष राऊत व विशाल दुधे यांनी नहरात उडी टाकली. त्यांना चार मुलांना वाचविण्यात यश मिळवले. परंतु, काजल वाहून गेल्याने तिला जलसमाधी मिळाली.
काजल ही चांदाळा येथील आश्रमशाळेत शिकत होती. पोळ्याच्या सणानिमित्त ती सावली येथे आपल्या आई-वडिलांकडे आली होती. एक दिवसापूर्वीच घरी आलेली मुलगी नहरात वाहून गेल्याने मक्केवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती पोलिस विभागाला देण्यात आली. माहिती कळताच सावलीचे ठाणेदार आशिष बोरकर यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठून काजलचा शोध सुरू केला. परंतु वृत्तलिहिस्तोवर काजल सापडली नव्हती. मागील अनेक दिवसापासून गोसेखुर्द नहराला सिमेंट काँक्रीटचे सपाटीकरण सुरू आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने नहराला असोलामेंढा तलावाचे पाणी सोडण्यात आले आहे. संबंधित विभागाने नहराला सिमेंट काँक्रीटचे सपाटीकरण करीत असताना दर एक किलोमीटर अंतरावर पायर्या देण्यात याव्या, अशी मागणी मागील अनेक महिन्यांपासून करण्यात आलेली आहे. मात्र, संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने पायर्याविना वाहत जाणार्या मानव किंवा जनावरास काढणे शक्य नसल्याने त्यांचा नाहक बळी जात आहे. त्यामुळे नहराला पायर्या देण्याची मागणी संबंधित विभागाकडे केल्या जात आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…