किशोर गंगाराम आवारे याचे खुनाचे गुन्हयातील मास्टरमाइंड चंद्रभान विश्वनाथ खळदे यास गुंडा विरोधी पथकाने नाशिक येथून घेतले ताब्यात.

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

गुंडा विरोधी पथक पिंपरी चिंचवड शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज!ऑनलाईन पुणे:- दि. १२/०५/२०२३ रोजी जनविकास समितीचे संस्थापक अध्यक्ष मयत किशोर गंगाराम आवारे यांचा तळेगाव दाभाडे नगर परीषदेच्या कार्यालयाचे आवारात शाम अरुण निगडीकर, प्रविण ऊर्फ रघुनाथ संभाजी धोत्रे, आदेश विठठल धोत्रे सर्व राहणार तळेगाव दाभाडे व संदीप ऊर्फ नन्या विठठल मोरे रा. आकुडी, पुणे यांनी गावठी पिस्तुलाने गोळीबार करुन कोयत्यांनी वार करून खुन केला होता, सदर घटने बाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद क्रमांक २३३/२०२३, भा.द.वि.क. ३०२,१२० (ब) भा.ह.का. कलम ३.४, २५ महा. पो. का. क. ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.

सदर गुन्हयाचे तपासामध्ये गुन्हयाचा कट रचला म्हणून गौरव चंद्रभान खळदे रा. तळेगाव दाभाडे, पुणे यास अटक करण्यात आली असुन गुन्हयाचा मास्टर माइंड आरोपी नामे चंद्रभान विश्वनाथ खळदे, वय ६३ वर्ष, रा. कडोलकर कॉलनी, ऋतूचंद्र, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे पाचे नाव निष्पन्न झाले होते, तेव्हापासून भानु खळदे हा त्याचा वापरता मोबाईल बंद करून तो रहात असलेल्या ठिकाणाहून निघुन गेला होता. सुमारे ०२ महीने झाले तरीही भानू खळदे हा यापूर्वी सुमारे १५ वर्ष नगरसेवक असल्याने त्याचे बाबत कोणीही माहीती देत नसल्याने त्याचा थांगपत्ता लागत नव्हता.

गुंडा विरोधी पथकाचे अधिकारी सपोनि माने व अमलदार प्रविण तापकीर, सोपान ठोकळअण्णा व शुभम कदम यांनी पाहीजे आरोपी चंद्रभान विश्वनाथ खळदे याचे नातेवाईक, मित्र व ओळखीचे इसमाकडे तपास करीत होते, त्यांनी प्राप्त केलेल्या नातेवाईकांचे मोबाईल नंबरचे पोलीस अमलदार गणेश मेदगे यांनी केलेल्या तांत्रीक विश्लेषणावरुन पाहिजे आरोपी हा प्रथम खंडाळा नंतर यवत ता. दौड नंतर हैदराबाद व नंतर नाशिक येथील सिंधी कॉलनी येथे वास्तव्यास असले बाबत माहीती मिळताच मा वरिष्ठांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एच. व्ही. माने व स्टाफ असे नाशिक येथे जावून नाशिक शहर व परीसरात शोध घेवून त्यास शिताफिने पकडुन पिंपरी चिंचवड येथे आणुन तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे हे करीत आहेत. आरोपी चंद्रभान विश्वनाथ खळदे याचेवर यापूर्वी दाखल असलेले गुन्हे पोलीस ठाणे

अ.क्र. गु.र.नं. व कलम तळेगाव दाभाडे / १९९२, भादवि कलम ३०२
१ २ तळेगाव दाभाडे १८८/२००६, भादवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३२३, ५०४, ५०६
तळेगाव दाभाडे २३३/२०२३, भा.द.वि.क.३०२,१२० (ब) भा. ह. का. क. ३, ४, २५ महा. पो. का. क. ३७ (१) (३) सह १३५

सदरची कारवाई ही मा. श्री. विनयकुमार चौबे सो पोलीस आयुक्त, मा. डॉ. श्री. संजय शिंदे सो सह पोलीस आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी सौ. अपर पोलीस आयुक्त, स्वप्ना गोरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), सतिश माने, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे एच. व्ही. माने सहायक पोलीस निरीक्षक पोलीस अंमलदार हजरत पठाण, प्रविण तापकिर, सोपान ठोकळअण्णा, गंगाराम चव्हाण, विक्रम जगदाळे, गणेश मेदगे, विजय गमिरे, सुनिल चौधरी, नितीन गैंगजे, शाम बाबा, विजय तेलेवार, मयूर दळवी, रामदास मोहीते, ज्ञानेश्वर गिरो, शुभम कदम, तौसीफ शेख तसेच तांत्रीक विश्लेषण विभागाचे नागेश माळी व पोपट हुलगे यांनी केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

आता लाडका पत्रकाराचा नंबर लागेल का ! महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लक्ष देतील का ?

देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…

23 mins ago

नाशिक: पती पत्नीने गळफास लावून आत्महत्या, 10 वर्षीय चिमुकली मुलगी सुद्धा पलंगावर मृतावस्थेत.

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…

37 mins ago

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व. शरद काळे यांचा स्मृति दिन साजरा.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…

2 hours ago

कवठा येथील सरपंच प्रवीण जायदे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.

खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…

2 hours ago

सिंदी तहसील कार्यालय वर विविध मागण्यासाठी कामगार नेते डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

2 hours ago