दशरत गायकवाड, पुणे प्रतिनिधी
पुणे:- दि.21 ऑगस्टला सकाळच्या सुमारास एक खळबळजनक घटना समोर आली होती. अक्षय प्रकाश भिसे वय 26 वर्षे, रा. गल्ली नं.8 दिनकर पठारे वस्ती, खराडी पुणे या युवकाचा दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी अज्ञात कारणासाठी अग्निशस्त्रातुन गोळ्या झाडुन निर्घुण हत्या केल्याने पोलीस ठाणे चंदननगर येथे भादवी कलम 302 राह भाहका 3/25 नुसार गुन्हा दाखल केला होता. दाखल गुन्ह्यात वरिष्ठांनी समांतर तपास करणेबाबत गुन्हे शाखा युनिट 4 पुणे शहर यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते.
प्राप्त आदेशाप्रमाणे गुन्हे शाखा युनिट 4, पुणे शहर कडील सर्व अधिकारी व अंमलदार यांची तीन पथके तयार करुन गुन्ह्याचे घटनास्थळास भेट दिली. पैकी एका पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करुन गुन्ह्याचे घटनास्थळ व आजुबाजुस उपलब्ध सिसिटीव्ही कॅमेरे तपासले, तसेच दुस-या पथकाने यातील मयत मयताचे जवळचे नातेवाईक व त्याचे मित्र यांच्याकडे दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने प्राथमिक समांतर तपास केला. पैकी सिसिटीव्ही फुटेज तपासणारे पथक टेंभुर्णी ता. म्हाडा, जि. सोलापुर येथे आरोपींचा माग काढत पोचले. त्याचवेळी दुस-या पथकाने मयत मयताचे जवळचे नातेवाईक व त्याचे मित्र यांचेकडे प्रत्यक्ष गुन्हे शाखा युनिट 4, पुणे शहर कार्यालयात कसून तपास केला. तपासामध्ये मयताचे सर्व नातेवाईक, मित्र मंडळी यांच्याकडे करण्यात आलेला तपास व तपासण्यात आलेले सिसिटीव्ही फुटेज वावरुन आरोपी हे टेंभुर्णी, ता. म्हाडा, जि. सोलापुर येथील आहेत या निष्कर्षावर दोन्ही पथके पाहोचली. मयताचे नातेवाईकांचे संपर्कातील संतोष सत्यवान शिंदे मु. पो. कान्हापुरी, मुंडफने वस्ती, ता. पंढरपुर जि. सोलापुर हा घटना घडण्याचे अगोदरपासुन व घटना घडल्यानंतर सतत नातेवाईकांच्या संपर्कात होता. तो मयताचे नातेवाईकांकडुन पोलीसांच्या हालचालीची माहिती घेत होता. त्यावरुन गुन्हे शाखा युनिट ४ कडील पथकाने टेंभुर्णी येथे जावुन तपास केला असता संतोष शिंदे याच्याकडे गुन्ह्यात वापरलेल्या वर्णणाची दुचाकी घेवुन तो दि.24 ऑगस्ट रोजी टेंभुर्णी येथील त्याचा मित्र संग्राम राजु बामणे याचेकडे सागर लॉज टेंभुर्णी येथे आला होता. ते रात्री दुचाकीवरुन पुण्याच्या दिशेने गेले होते व दि.25 ऑगस्ट रोजी सकाळी टेंभुर्णी येथे परत आले होते. अशी खात्रीशीर माहीती पथकाला मिळाली होती. त्यावरुन संतोष शिंदे व संग्राम बामणे यांचेवरील संशय अधिकच बळावला. संतोष शिंदे याची माहीती घेतली असता तो सध्या भालकी, ता. भालकी, जि. बिदर, राज्य कर्नाटक येथे राहुन सोने आटणीचा व्यवसाय करतो.. तसेच संग्राम बामणे हा टेंभुर्णी येथील हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणुन काम करतो. अशी खात्रीशीर माहीती मिळाली.
मयताचे नातेवाईक व मित्रमंडळी यांच्याकडे तपास करणारे सहा पोलीस निरीक्षक विकास जाधव, व स्टाफ यांच्या पथकाने दिलेली उपयुक्त माहीती तसेच इतर दोन्ही पथकांना प्राप्त खात्रीशीर माहितीवरुन संशयित आरोपी शोध कामी गुन्हे शाखा युनिट ४ कडील दोन वेगवेगळी पथके मा वरिष्ठांचे परवानगीने रवाना झाली होती. पैकी एका पथकाने भालकी, ता. भालकी, जि. बिदर राज्य कर्नाटक येथे जावुन संशयित आरोपी नामे संतोष सत्यवान शिंदे वय 28 वर्षे धदा सोने गाळणी, रा. सध्या बिरादर कॉम्प्लेक्स, सराफा बाजार, भालकी, ता.- भालकी, जि. बिदर, राज्य कर्नाटक, मुळ पत्ता मु. पो. कान्हापुरी, मुंडफने वरती, ता. पंढरपुर जि. सोलापुर यास ताब्यात घेतले. तसेच पोलीस उप निरीक्षक जयदीप पाटील, व स्टाफ याना मौजा टेंभुणी, ता. म्हाडा, जि. सोलापुर येथुन सराईत आरोपी नामे संग्राम उर्फ बाबु राजु बामणे रा. मु. पो. कान्हापुरी, मारुती मंदीरासमोर, ता. पंढरपुर जि. सोलापुर यास ताब्यात घेतले.
दोन्ही पथकांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीतांना गुन्हे शाखा युनिट 4 पुणे शहर कार्यालय रेंजहिल्स, खडकी, पुणे येथे आणले. दोन्ही आरोपीतांकडे गुन्ह्याचे अनुषंगाने कसुन तपास करता संशयित आरोपी नामे संतोष शिंदे याने सांगीतले की, मयत इसमाचे पत्नी बरोबर तीचे लग्नापुर्वी त्याचे प्रेमसंबंध होते. परंतु लग्नानंतर तीचा नवरा मयत अक्षय प्रकाश भिसे हा त्यांचे प्रेम संबंधात अडचण ठरत असल्याने त्याचा कायमचा काटा काढण्याचे ठरविले होते. त्याचा कसा काटा काढावा व मागे पुरावे राहणार नाहीत याकरीता तो टीव्ही व मोबाईलवर क्राईम संबंधातील वेब सिरीज सिरीअल मुव्हीज पाहायचा. त्याआधारेच त्याने अक्षय भिसेला मारायचा प्लॅन केला. त्याला मारणेकरीता त्याने एक अग्निशस्त्र प्राप्त केले. तसेच एक स्पोर्ट बाईक हुम्नाबाद (राज्य कर्नाटक) येथुन चोरी केली. तसेच गुन्हा करताना ओळख लपविण्यासाठी देषांतर केले आणि चेहरा लपविण्यासाठी हेल्मेटचा वापर केला, अक्षय भिसे याचेवर मित्र संग्राम बामणे वास सोबत घेवुन पाळत ठेवुन दि.21ऑगस्ट रोजी पहाटे त्याचा गोळ्या घालून काटा काढला. त्याचा काटा काढुन दोघे टेंभुर्णी येथे गेले. तेथे सग्राम बामणे यास सोडुन भालकी येथे निघुन गेला. सदरचा गुन्हा वर नमुद दोन्ही आरोपीतांनी केला असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने दोन्ही आरोपीतांना पुढील कारवाईकरीता पोलीस ठाणे चंदननगर पुणे शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे…
सदरची उल्लेखनिय कामगीरी मा. पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णीक, गा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त श्री. श्रीनिवास घाडगे, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक श्री. जयंत राजुरकर, सहा. पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उप निरीक्षक जयदीप पाटील, पोलीस अंमलदार महेंद्र पवार, राजस शेख हरिष मोरे, प्रविण भालचिम, सारस साळवी, अशोक शेलार, विनोद महाजन, रमेश राठोड, विठ्ठल वाव्हाळ, संजय आढारी, अजय गायकवाड, मनोज सांगळे, वैशाली माकड़ी, शितल शिंदे, स्वप्निल कांबळे यांनी केली आहे.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…