सागर शिंदे, वाशिम जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम:- विदर्भातील शेतकऱ्यांना नेहमीच अनेक समस्यांचा सामना करत शेती करावी लागते, पाऊसपाणी, हवामान, हंगाम आणि शेतकरी यामध्ये एक अद्वैत नाते आहे. या नात्यामध्ये आता दुरावा निर्माण होत आहे. कधी दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ, तर कधी गारपीट आणि दुबार पेरणी हे स्वप्नभंग सोबत घेऊन शेतकरी वावरत, खुरडत आणि सरपटत राहतो.
शेतात पिकणारे धान्य हेच शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहाचे साधन असते. पेरा करूनही ते अंकुरले नाही, तर शेतकर्यांवर मोठे संकट कोसळते. सद्य:स्थितीत विदर्भावर हे संकट ओढवले आहे. वाशिम जिल्ह्यात उशिरा आलेल्या पावसानंतर आता सोयाबीन पेरण्या पूर्ण झाल्या आहेत, परंतु बियाणे अंकुरले नसल्याने शेतकऱ्यांवर आता नवीन संकट ओढवल आहे.
वाशिम तालुक्यातील टो येथील शेतकरी नागेश शिवाजी काकडे यांनी शहरातील पुसद नाका येथे असलेल्या विघनहर्ता कृषी सेवा केंद्रातून सोया केडीएस ७५३, बॅच नं. २०० आदित्य सिड्स कंपनीचे १० मे २०२४ राजी मुदत संपणाऱ्या २४ किलोच्या च्या ४ बॅगा ६ जून रोजी खरेदी केल्या होत्या. विकत घेतल्या आणि ५ जुलै राजी तुरीसह त्याची पेरणी केली. तूर व्यवस्थित उगवली मात्र सोयाबीन उगवलेच नाही. विशेष म्हणजे सोयाबीन बियाणे बॅगवर दिलेला बॅच क्रमांक व शेतकऱ्याला दिलेल्या बिलावर बॅच क्रमांक हा वेगळा लिहलेला असल्याचे शेतकरी तक्रार करण्यासाठी गेले असता त्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या कृषी सेवा केंद्राचा परवाना तातडीने रद्द करावा व शेतकऱ्याला, पेरणीसाठी झालेला बियाणे, खत, ट्रॅक्टर, मजुरी व आता दुबार पेरणीचा खर्च भरून द्यावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष बालाजी मोरे यांनी दिला आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…