उमेश इचे, पातूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- जिल्हातील पातूर तालुक्यातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथे एका हिंदू दलित युवकाचा मुस्लिम धर्मात धर्मांतरणाचा धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. हे प्रकरण पातूर तालुक्यातल्या आलेगावातून समोर आले आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पातूर तालुक्यातल्या आलेगाव येथे राहणाऱ्या एका हिंदू दलीत तरुणाने मुस्लिम धर्म स्वीकारला आहे. त्यात त्या तरुणाच्या आई खळबळजनक आरोप केले आहे. माझ्या मुलाचं धमकावून धर्मांतर करण्यात आले आहे. हा आरोप त्याच्या आईनं केल्यानंतर या प्रकरणी चान्नी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर ॲट्रॉसिटीसह धमकावण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, मुस्लिम धर्मात धर्मांतर केलेल्या तरूणाचे नाव शुभम होते. आता तो आपले नाव सर्वांना ‘मोहम्मद अली’ आहे अस सांगत आहे. शुभमने 21 नोव्हेंबर 2022 रोजी इस्लाम कबूल केल्याचे शपथपत्रावर लिहिले आहे. धर्मांतराची प्रक्रिया बुलढाणा जिल्ह्यातील उंद्री गावातील मदरशात झाल्याचे त्याच्या आईने म्हटले आहे. आपल्या मुलाला गावातील अल्ताफ गादीवाले, अन्सार गादीवाले, शेख तन्वीर, शेख अजीम शेख मंजूर या चौघांनी दबाव टाकून आणि पैशाचे आमिष दाखवून धर्मांतरण घडवून आणल्याचा आरोप शुभमच्या आईने केलाय.
उपमुख्यमंत्री यांनी घेतली घटनेची दखल…
ही घटना समोर येताच संपूर्ण अकोला जिल्हात खळबळ माजली आहे. अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी या प्रकरणाची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्यानंतर फडणवीस यांनी अकोला जिल्हाचे पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून माहिती घेतली. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणासह गावातील इतर धर्मांतरण प्रकरणाचीही चौकशी करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…