संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण
राजुरा :- तालुक्यातील विहीरगाव येथे मौजा किरमिरी येथिल दुर्गम भागात ज्ञान दानाचे सेवा देत असलेले शिक्षक मा. प्रमोद लहुजी साळवे यांच्या वाढदिवसा निमित्त साळवे स्वस्त औषधी सेवा राजुरा, बल्लारपूर जेनेरिकप्लस फार्मा, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा राजुरा व ग्राम पंचायत विहीरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले, या शिबिराचे उद्घाटक विहीरगाव ग्रा. पं. चे सरपंच रामभाऊ देवईकर यांचे हस्ते करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय भाषणात सरपंच रामभाऊ देवइकर यांनी सांगितले की गावाप्रती प्रत्येक व्यक्तीला प्रेम असते पण आपणास ज्या मार्गातून सेवा करता येईल त्या मार्गाने जर प्रत्येकाने सेवा व सहकार्य दिले तर आपले गाव एक आदर्श ठरू शकते. याच गावाप्रती असलेल्या सदभावनेने प्रमोदजी साळवे यांनी सदर मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केल्याचे बोलले, या शिबिर मधे गावातील प्रथम डॉक्टर ज्यांनी 35 वर्ष गावातील व आजूबाजूच्या गावात अविरत सेवा दिली असे डॉ. गंगाधर बोढे यांचा साळवे परिवारातर्फे सत्कार करण्यात आला. कारण आज वैद्यकीय शिक्षण घेवून डॉक्टर शहरात सेवा देतात पण गावात कुणी येत नाही अश्या परिस्थतीत डॉक्टर बोढे यांनी दिलेली सेवा अविस्मरणीय आहे. कोविड सारख्या महामारीत जे कार्य केलं ते विसरता येत नाही. आज गावात सा थीच्या आजाराने थैमान घातले आहे तेव्हा जी सेवा त्यांच्याकडून होत आहे हे ईश्वरीय कार्य खरंच दखल घेण्याजोगे आहे. सध्याचे गावातील परिस्थिति बगता होतकरू लोकांना सेवा देण्याच्या उद्धेशाने शिबिर घेण्यात आले, शिबिरात 197 लाभार्त्यान्नी शिबिराचा लाभ घेतला.
या कार्यक्रमास उपसरपंच नीलकंठजी खेडेकर, पोलिस पाटील सचिन बोढे, उद्धव पा. साळवे, पिलाजी पा. साळवे, इर्शाद शेख (सामाजिक कार्यकर्ता), रामचंद्र पा. शेरकी, प्राचार्य गणेश लोहे, नरेंद्र देशकर क्षेत्र सहायक विहीरगाव , कोडापे सर आदि उपस्थित होते, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मारोती साळवे सर, नामदेव साळवे चंद्रपूर, प्रवीण पिंपळकर, सुधीर साळवे, डॉ. गंगाधर बोढे, डॉ. सोनाली मुजुमदार, डॉ. नेहा बहूरिया, अंजली कुशवाह, प्रविन मेकर्तीवार, वंदना साळवे, बेबीताई साळवे व माधुरी साळवे यांनी परिश्रम घेतले.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…