पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626
लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागामध्ये गावठी हातभट्टी दारुचे अवैध धंदे चालु असल्याच्या तक्रारी नागरिकांकडुन पोलीसांना प्राप्त झाल्या होत्या. अशा हातमट्टीच्या दारूमुळे जनसामान्याचे आरोग्य धोक्यात येवून त्यांचे शरीरावर विपरीत परिणाम होत असल्याने दिनांक ११/०७/२०२३ रोजी लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विश्वजित काईगंडे यांनी सपोनि रविंद्र गोडसे, सपोनि गजानन जाधव व त्यांच्या तपास पथकाच्या दोन टिम तयार करून त्यांना योग्य ते निर्देश देउन मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने रवाना केले होते. त्यानुसार सपोनि गोडसे, सपोनि जाधव व त्यांच्या टिमने त्यांची वाहने एका विशिष्ट अंतरावर लावुन तेथुन सुमारे १ किमी पायी पिंपरी सांडस गावेचे हद्दीत गट नंबर ८३४ मधील एका पडीक जागेतील हातभट्टीच्या धंदयावर प्रभावी छापा टाकला. त्यामध्ये त्यांनी ७० लिटर दारू जप्त करून, २५०० लिटर रसायन, त्याशिवाय दारु गाळण्याचे लोखंडी बॅरल अॅल्युमिनिअमचा पाईप इ साहित्य जागीच ताब्यात घेवून नष्ट केले. आणि या अनुषंगाने लोणीकंद पोलीस स्टेशनला दिनांक ११/०७/२०२३ रोजी गु.र.क्र. ५६० / २३ कलम महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (फ) (ब) (क). ८३ प्रमाणे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्हयात हातभट्टी चालक दोन इसमांना लोणीकंद पोलीसांनी दि. १२/०७/२०१३ रोजी १९/३० वा. अटक केली आली असुन सदर हातभट्टीसाठी लागणा-या मालाचा पुरवठा करणारा इसम सदर गुन्हयात फरार आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि रविंद्र गोडसे हे करीत आहेत. तसेच यापूर्वी देखिल दिनांक ०१/०७/२०२३ रोजी मौजे नावडी गावचे हद्दीत पोलीसांनी प्रभावी छापा टाकून हातभट्टी उष्णस्त करून एकुण ८६,६००/- रुपये किंमतीचा माल हस्तगत करून त्यामध्ये एकुण ०३ आरोपींना अटक करुन त्यांची ०३ दिवस पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली होती…
सदरची कामगिरी मा. श्री रंजनकुमार शर्मा सो अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्री. शशीकांत बोराटे सो, पोलीस उपआयुक्त सो परिमंडळ ४, पुणे शहर, मा. श्री. संजय पाटील सो, सहा. पोलीस आयुक्त सो, येरवडा विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शना खाली विश्वजीत काइंगळे सो वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर, मारुती पाटील सो, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सिमा ढाकणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर, तपास पथकाचे सपोनि रविंद्र गोडसे, सपोनि गजानन जाधव, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, पोलीस नाईक सागर जगताप, पोलीस पोलीस नाईक कैलास साळुंके, पोलीस नाईक विनायक साळवे, पोलीस नाईक स्वप्निल जाधव, पोलीस शिपाई अमोल ढोणे, पोलीस शिपाई साई रोकडे, पोलीस शिपाई सचिन चव्हाण, पोलीस शिपाई प्रशांत घुमाळ, महिला पोलीस शिपाई वृंदावणी चव्हाण, कोमल भोसले, निलम कोळेकर लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी केली आहे.
यापुढेही लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंधे चालु असल्यास लोणीकंद पोलीस स्टेशन मोबाईल नंबर ९५२७०६९९०० यावर कळविण्याचे आवाहन मा. विश्वजीत काइंगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी केले आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…