नितेश पत्रकार यवतमाळ प्रतिनिधी मो. नं.7620029220
यवतमाळ,दि.27:- येथील अभिनय गुरु तथा नट्यलेखिका प्रा.दीपाली आतिश सोसे यांनी स्थापन केलेल्या ‘आनंदी गुरुकुल अँक्टिंग अकॅडमी आणि विद्यार्थी सर्वांगीण विकास केंद्र’मधील विद्यार्थी कलाकार समर्थ वाघमारे आणि अनिकेत गौरकार यांचे नुकतेच मुंबई येथे स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच गीत गात आहे’या मालिकेमध्ये चित्रिकरण झाले आहे.
या मालिकेचे दिग्दर्शक केदार वैद्य असून ट्रंप कार्ड प्राॅडक्शनच्या प्रमुख निर्मात्या सरिता नेसवणकर या असून या मालिकेमध्ये प्रसिध्द कलाकार अभिजित खांडकेकर, प्रिया मराठे, अवनी तायवाडे, सुनिला करंबेडकर, पल्लवी वैद्य यांच्यासह अनेक नामवंत कलाकारांसोबत चित्रिकरण करतांना विशेष आनंद झाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. याआधीही ‘आनंदी गुरुकुल’चे विद्यार्थी महेश राठोड याने सोनी मराठीवरील ‘ती फुलराणी’, समर्थ वाघमारे, रिया वाघमारे यांनी झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’, रेहान नदाफ यांनी सन मराठीवरील ‘आभाळाची माया’, सानवी लंगोटे, सार्थक लंगोटे, अनीरुध्द जळगावकर, स्वराज सोसे,अनुप फाले यांनी आरआरसी नेटवर्कवर तसेच इतरही अनेक वाहिन्यांवरून विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे.नुकतीच समर्थ वाघमारे,अनिकेत गौरकार या दोघांना स्टार प्रवाह वरील ‘तुझेच गीत गात आहे’ या मालिकांमध्ये मान्यवरांसोबत झळकण्याची संधी ही फक्त गुरुवर्या प्रा.दीपाली सोसे मॅडम यांच्यामुळेच मिळाली असल्याची आणि मुलांविषयी जी स्वप्नही आपण पाहू शकत नाही,ती यशाची स्वप्न पूर्ण करण्याची भुमिका नेहमीच आनंदी गुरुकुल ची असते,अशी प्रांजळ भावना पालकांनी यावेळी व्यक्त केली.हे दोन्ही विद्यार्थी कलाकार गणेशोत्सव विशेष काही भागात झळकणार आहेत.सलग काही दिवस मुंबई येथे मुलांचे चित्रिकरण पार पडले.
यापूर्वी विद्यार्थ्यांना दबंग-३, सिरियस मेन, जवान, इन्स्टिट्युट आँफ पाॅवटाॅलाॅजी, एक ती, पंधरा लाख खात्यात गाव गेले गोत्यात, हाॅस्टेल डेझ, शर्तीचा रुपया, हाथी मेरा साथी, मिडियम स्पायसी,इलूइलू यासह अनेक हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगु भाषेतील चित्रपटांमधूनही विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे. विदर्भ, खानदेश, मराठवाडामधील विद्यार्थ्यांना संधी देणारी, मागील पाच वर्षांपासून सातत्याने विद्यार्थ्यांच्या अभिनय आणि सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असणारी ही अकॅडमी पहिली असल्याची भावनाही आणि विद्यार्थ्यांच्या संपूर्ण यशाचे श्रेय गुरुवर्या प्रा.दीपाली सोसे मॅडम यांनाच जात असल्याची उत्स्फूर्त भावना यावेळी विद्यार्थी,पालकांनी व्यक्त केली.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…